जि.प. विभागप्रमुखांची आज बैठक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:48+5:302021-06-21T04:14:48+5:30
................................................. जि.प. शिक्षण समितीची आज सभा! अकोला : जिल्हा परिषद शिक्षण समितीची ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेली सभा गुरुवारी तांत्रिक ...
.................................................
जि.प. शिक्षण समितीची आज सभा!
अकोला : जिल्हा परिषद शिक्षण समितीची ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेली सभा गुरुवारी तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आली होती. समितीची ही सभा सोमवार, २१ जून रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संबंधित विविध मुद्दयांवर या सभेत चर्चा होणार आहे.
................................................................
जिल्हाधिकारी आज घेणार तक्रारींचा आढावा !
अकोला : टपाल स्वाॅफ्टवेअरव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महसूल विभागाशी संबंधित विविध तक्रारींचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सोमवार, २१ जून रोजी घेणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील महसूलविषयक आणि जिल्हाधिकारी कार्यालय आस्थापनांसंदर्भात प्राप्त विविध तक्रारींची माहिती घेण्यात येणार आहे.
..............................................
शिक्षण विभागाशी संबंधित
तक्रारींची घेतली माहिती !
अकोला : जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संबंधित विविध तक्रारी आणि शिक्षण विभागाच्या आस्थापनाविषयक कामांची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
...................................
शेती मशागतींच्या कामांना वेग !
अकोला : पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पेरणीसाठी जिल्ह्यातील विविध भागांत शेती मशागतींच्या कामांना वेग आल्याचे चित्र आहे.
..............................................
जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा !
अकोला : पावसाळा सुरू झाला असला तरी, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात अद्याप खरीप हंगामातील सार्वत्रिक पेरण्या सुरू झाल्या नाहीत. दमदार पाऊस झाल्यानंतरच जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांकडून दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.