सस्ती सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संदीप सरदार यांना गावातील पाच जणांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले असता, पोलीस स्टेशनच्या आवारात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संतोष काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सस्ती येथील सुभाष भिकनराव ताले व मळसूर येथील जि.प.सदस्य संदीप सरदार, दीपक सरदार यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. जिल्हा परिषद सदस्य यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी काळे, गौरव काळे, पंढरी गडदे, संतोष काळे, आतीश काळे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२३,१४३,१४७,१४९,५०६, तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे, तसेच दुसऱ्या गटातील विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार, प्रमोद मधुकर पवार, यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ३२३, ३४, कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, रात्री उशिरा एका गटातील चौघांना अटक करून, जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, चौघांना न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जि.प. सदस्याला मारहाण, चौघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:23 AM