चिंतेची बाब : १३ उमेदवारांत तिसऱ्या क्रमांकाची मतेअमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीत १० हजार १५४ मते अवैध ठरली. रिंगणातील १३ उमेदवारांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकाची पदवीधर मते अवैध ठरणे, ही चिंतेची बाब आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारी रोजी विभागातील पाच जिल्ह्यांत एक लाख ३३ हजार ९८२ मतदान झाले होते. यामध्ये भाजपचे रणजित पाटील यांना ७८ हजार ५१ व काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांना ३४ हजार १५४, तर तिसऱ्या क्रमांकावर १० हजार १५४ मते अवैध राहिलीत. पदवीधर मतदारांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर म्हणजेच जवळपास ८ टक्के मते अवैध ठरली, ही चिंतेची बाब आहे. मुळात पदवीधर निवडणुकीत कसे प्रकारे मतदान करावे, हे मतदारापर्यंत पोहचविण्यास व जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. तसेच उमेदवारांकडूनही याविषयी जागृतीचा अभाव राहिल्याने मतदारापर्यंत मतदान कसे करावे, ही माहिती पोहचू शकली नाही. हे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)- हे तर प्रशासनाचेच अपयशन्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीत पूर्वीची मतदारयादी रद्द करण्यात येऊन नव्याने यादी करण्यात आली. यामध्ये युवा मतदारांचे मोठ्या प्रमाणात मतदान होते. या एकल मतदान पद्धतीच्या निवडणुकीत हे युवा मतदार प्रथमच मतदान करीत होते. त्यांना मतदान कसे करावे, या विषयी पुरेसी माहिती न पोहचू शकल्यानेच मोठ्या प्रमाणावर अवैध मतदान झालीत. मतपत्रिकेवर दिला मतदारांनी सल्ला४ातमाजेणीदरम्यान एका मतपत्रिकेवर मतदाराने मतमोजणी अधिकाऱ्यांना मतमोजणीदरम्यान ''झोपू नका''. असा सल्ला दिला, तर अन्य एका मतपत्रिकेत जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी केली. या दोन्ही मतपत्रिका अवैध ठरल्या. तरी यावरील मजकूर मात्र चर्चेचा विषय ठरला. पाच जिल्हाधिकारी; ३० उपजिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ३० उपजिल्हाधिकारी, ३० तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व अन्य २४० कर्मचारी मतमोजणीसाठी होते. यामुळे सोमवारी विभागातील महसूल यंत्रणा ठप्प झाली. टपाली मतपत्रिकांचीदेखील सरमिसळयापूर्वीच्या निवडणुकीत टपाली मतपत्रिकांची स्वतंत्र मतमोजणी व्हायची, यावेळी टपालीसह २८० मतदान केंद्रावरील मतदानपत्रिका हौदात एकत्रित करण्यात आल्या. नोटाला ४६७ मतेया निवडणुकीत पाचव्या व अखेरच्या फेरीअखेर ‘नोटा’ला एकूण ४६७ मते मिळाली. पहिल्या फेरीत ११६, दुसऱ्या १०५, तिसऱ्या १३३, चौथ्या ३० व अखेरच्या फेरीत नोटा निरंक राहिला.
पदवीधरांची १० हजारांवर मते अवैध
By admin | Published: February 07, 2017 12:06 AM