शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

कोरोनामुळे पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:09 AM

अमरावती : कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय ...

अमरावती : कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयामुळे गरीब, सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.

गतवर्षी मार्चपासून कोरोनाने कहर केला. अनेकांना जीव गमवावा लागला. यात काही कुटुंबातील कर्ते निघून गेले, तर काहींचे कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक काळाच्या पडद्याड गेले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर शिक्षण, रोजगार, भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२०-२१ या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे.

--------------

पाचही जिल्ह्यांतील माहिती गोळा करणार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठअंतर्गत अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. प्राचार्यांकडून माहिती मागविली जाणार आहे. त्याकरिता आरोग्य यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे.

----------------------

कोट

आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी हा लाभ मिळणार आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून अशा विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

--------------

कोट

कोरोनाने पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले.

- मनीष गवई, सिनेट सदस्य