दोन आठवड्यांत आढळले १०,२२६ कोरोना संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:12 AM2021-05-16T04:12:07+5:302021-05-16T04:12:07+5:30
अमरावती : शहरापेक्षा ग्रामीण भागात दररोज कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील ...
अमरावती : शहरापेक्षा ग्रामीण भागात दररोज कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ११,३८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. १८६ जणांचा मृत्यू झाला. त्याच्या तुलनेत १ ते १३ मे या १३ दिवसांत ग्रामीण भागात तब्बल १०,२२६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून, १७२ जणांचा मृत्यू झाला आहे.
एप्रिल महिन्यातील ३० दिवसांत ११,३८६ कोरोना संक्रमितांची नोंद झाली होती. हा टप्पा मे महिन्यात १३ दिवसांतच गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संक्रमित बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गत महिन्याभरात जिल्ह्यात १८६ जण कोरोनामुळे दगावले. आता १३ दिवसांत १७२ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार, ग्रामीण भागात १ ते १३ मे या १३ दिवसांत सर्वाधिक बाधित ९१५ रुग्ण ९ मे रोजी नोंदविले गेले. २ मे रोजी सर्वांत कमी म्हणजेच ५७५ रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आले.
बॉक्स
तारीखनिहाय आढळले रुग्ण व मृत्यू
दिनांक रुग्णसंख्या मृत्यू संख्या
१ मे ७११ ०६
२ मे ५७५ १६
३ मे ६२४ १४
४ मे ८९२ १८
५ मे ८१५ १६
६ मे ८८९ १५
७ मे ७८१ ०६
८ मे ८३९ १३
९ मे ९१५ १४
१०मे ६८८ ०९
११ मे ८६३ ०९
१२ मे ७७१ १७
१३ मे ८६३ १९
एकूण १०२२६ १७२
कोट
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून चाचण्याही वाढवल्या आहेत. नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी