मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आरएफओची 11 पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 05:00 AM2021-08-05T05:00:00+5:302021-08-05T05:01:07+5:30

चार महिने झाल्यानंतर आता कुठे दीपाली चव्हाण यांच्या रिक्त जागेवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे पद भरले गेले. काही ठिकाणी अन्य वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे प्रभार, तर तर काही ठिकाणी वनपालांच्या भरोशावर कारभार सुरू आहे. मेळघाट वन्यजीव विभागाच्या खोंगडा परिक्षेत्राचा कारभार वनपालाच्या भरवशावर सुरू आहे. महिला वनकर्मचाऱ्यांच्या दोन तक्रारी असताना महिला उपवनसंरक्षक पीयूषा जगताप यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे पदभार देणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही.

11 posts of RFO vacant in Melghat Tiger Reserve | मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आरएफओची 11 पदे रिक्त

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आरएफओची 11 पदे रिक्त

googlenewsNext

नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चार वन्यजीव विभागांमध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची ११, तर वनरक्षकांची अनेक पदे एक ते दीड वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अतिसंरक्षित गाभा क्षेत्रातील जंगल, त्यातील  वाघ व वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची संवेदनशीलता हरपल्याचे संतापजनक चित्र आहे. मुख्यमंत्र्यांकडे वनखाते असताना दुर्लक्ष करण्यात येत आहे. 
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाने  मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनखाते पूर्णतः ढवळून निघाले. चार महिने झाल्यानंतर आता कुठे दीपाली चव्हाण यांच्या रिक्त जागेवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे पद भरले गेले. काही ठिकाणी अन्य वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे प्रभार, तर तर काही ठिकाणी वनपालांच्या भरोशावर कारभार सुरू आहे. मेळघाट वन्यजीव विभागाच्या खोंगडा परिक्षेत्राचा कारभार वनपालाच्या भरवशावर सुरू आहे. महिला वनकर्मचाऱ्यांच्या दोन तक्रारी असताना महिला उपवनसंरक्षक पीयूषा जगताप यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे पदभार देणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. जंगलाचे संरक्षण, अवैध वृक्षतोड व वनउपजाच्या अवैध वाहतुकीला लगाम घालण्यासह अतिरिक्त कामांच्या ताणामुळे क्षेत्रीय कर्मचारी तणावात आहेत.  काही जागा भरल्या असल्यातरी बहुतांश पदे रिक्त असल्याचा परिणाम वनविभागाच्या कामकाजावर होत आहे.

सिपना वन्यजीव विभागात सर्वाधिक चार रिक्त
सिपना वन्यजीव विभागात आरएफओची सर्वाधिक चार पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सेमाडोह परिक्षेत्र, सेमाडोह संकुल या दोन्ही पदांचा कारभार विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे आरएफओ सम्राट मेश्राम यांच्याकडे आहे. फिरते दक्षता पथक (मोबाईल स्काड) आरएफओ नरेंद्र यूवनाते यांना मूळ काम सोडून पुनर्वसन देण्यात आले आहे. चौराकुंड येथील पदभार वनपालाकडे आहे. अतिदुर्गम हतरू क्षेत्राचा पदभार अमरावती येथील कार्यालयीन आरएफओकडे आहे. गुगामल वन्यजीव विभागातील ढाकणा मोबाईल स्कॉड आरएफओ जारिदा क्षेत्राचा कारभार पाहत आहेत. अकोट वन्यजीव विभागातील मोबाईल स्कॉडचे पद रिक्तच आहे. सिपना वन्यजीव विभागात एकूण चार, अकोटमध्ये नुकतेच दोघांचे स्थानांतर करण्यात आल्याने तीन, गुगामल वन्यजीव विभागात दोन, तर मेळघाट वन्यजीव विभागात दोन अशा आरएफओच्या एकूण ११ रिक्त झाल्या आहे.
 

सिपना वन्यजीव विभागात जारिदा, चौराकुंड, हतरू व सेमाडोह या चार ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या जागा रिक्त आहेत. यासंदर्भात मासिक अहवालात वरिष्ठांना माहिती पाठविली जाते.
- कमलेश पाटील, 
सहायक वनसंरक्षक, 
सिपना वन्यजीव विभाग परतवाडा

गुगामल वन्यजीव विभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या व १६ वनरक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला माहिती पाठविण्यात आली असून बदली प्रक्रिया सुरू आहे. 
- राजकुमार पटवारी, 
सहायक वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा

 

Web Title: 11 posts of RFO vacant in Melghat Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.