झेडपीतून १३ वर्षांच्या चंदन झाडाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:36 PM2017-12-21T23:36:29+5:302017-12-21T23:36:48+5:30

येथील जिल्हा परिषदेच्या उद्यानातून १३ वर्षे आयुर्मानाचे चंदनाचे झाड बुधवारी रात्री ८.३० वाजता सुमारास दोन चोरट्यांनी कापून नेले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

 13-year-old sandalwood tree stolen from ZDP | झेडपीतून १३ वर्षांच्या चंदन झाडाची चोरी

झेडपीतून १३ वर्षांच्या चंदन झाडाची चोरी

Next
ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : सुरक्षा वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील जिल्हा परिषदेच्या उद्यानातून १३ वर्षे आयुर्मानाचे चंदनाचे झाड बुधवारी रात्री ८.३० वाजता सुमारास दोन चोरट्यांनी कापून नेले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.
‘लोकमत’ने गुरुवार, २१ डिसेंबर रोजी ‘चंदनाच्या झाडाची माहिती द्या अन् दोन हजार मिळवा’ या मथळ्याचे वृत्त प्रकाशित केले. अधिकाºयांचे बंगले, प्रशासकीय कार्यालये चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या टोळ्यांपासून असुरक्षित असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्तावर या घटनेने शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी रात्री सुरक्षा रक्षक मकेश्वर हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींच्या दालनाचे दार बंद करीत असताना, उद्यानात झाड कोसळल्याचा आवाज आला. दोन चोरटे खांद्यावर चंदनाचे झाड घेऊन पळाल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना माहिती दिली. रात्री ११ वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी धक्कादायक असून, प्रशासकीय कार्यालयांसह परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title:  13-year-old sandalwood tree stolen from ZDP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.