विद्यापीठात १.४५ लाखांचा चालान घोटाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:11 PM2018-02-18T22:11:55+5:302018-02-18T22:12:33+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक लाख ४५ हजार रूपयांचा चालान घोटाळा झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक लाख ४५ हजार रूपयांचा चालान घोटाळा झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील रमेश मंडळकर यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून प्राचार्य एम.बी. भुसारी, परीक्षा संचालक व मूल्यमापन मंडळाचे संचालक जयंत वडते, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले आहे. तक्रारीनुसार विद्यापीठात नियमानुसार माहे जुलै २०१७ मध्ये हिवाळी परीक्षा चे आवेदन नियमानुसार महाविद्यालयाकडे सादर केले आहे. यात चिखली येथील श्री. शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी. भुसारी यांच्या स्वाक्षरीने विद्यापीठाचे पॉवर ज्योती खाते क्रमांक ३१३१२०४०९७२ चालानद्वारे चिखली येथील भारतीय स्टेट बँकेत पैशाचा भरणा केल्याचा खोटे दर्शवून कव्हरनोट पत्रासोबत विद्यापीठाकडे चालानप्रत वेगवेगळ्या रक्कमा पाठविण्यात आल्या आहेत. प्राचार्य भुसारी यांनी विद्यापीठाकडे पाठविलेल्या परीक्षा आवेदनपत्र, त्यासंबंधी लागणारी फी रक्कम विद्यापीठाकडे पाठविल्याचे भासवून पत्रव्यवहार केला आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारातून गोळा करण्यात आली आहे. खरे तर प्राचार्य भुसारी यांनी कोणत्याही प्रकारची जमा, डिपॉझिट, पैशाचा भरणा प्रत्यक्षात केला नाही. तथापि ६९६ विद्यार्थ्यांचे परीक्षा फी ची किती रक्कम जमा झाली याची खातरजमा न करता खोट्या चालानवर विश्वास ठेऊन ६९६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे हिवाळी परीक्षा प्रवेशपत्र दिले आहे. विद्यापीठाचे आर्थिक नुकसानीचा हा प्रकार असून यातील दोषींवर कठोर शासन व्हावे, अन्यथा हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देऊ, असे तक्रारीत मंडळकर यांनी म्हटले आहे.
संबंधित प्राचार्यांना बोलावले आहे. चालानची रक्कम जमा झाली अथवा नाही, हे मंगळवारी स्पष्ट होईल. याबाबत लेखाधिकाºयांसोबत चर्चा झाली आहे.
- राजेश जयपूरकर,
प्र-कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ