लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी अवैध दारूसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:25+5:302021-02-24T04:14:25+5:30
३४ गुन्हे दाखल, ४३ आरोपींना अटक, विशेष पथक, गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई अमरावती : महानगराच्या हद्दीत लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ...
३४ गुन्हे दाखल, ४३ आरोपींना अटक, विशेष पथक, गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
अमरावती : महानगराच्या हद्दीत लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी देशी-विदेशी दारूसह १५ लाखांचा मुद्देमाल पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक व गुन्हे शाखेने जप्त केला. ३४ गुन्हे दाखल करून ४३ जणांना अटक करण्यात आली.
कोराेना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री ८ पासून लॉकडाऊन लागू केला आहे. या कालावधीत देशी, विदेशी दारूविक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक, गुन्हे शाखेने आयुक्तालय अंतर्गत धाडसत्र राबविले. विविध प्रकरणांत ३४ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ४३ आरोपींना अटक झाली आहे. मंगळवारी १ लाख ४ हजार २४८ रुपयांची देशी दारू, तर १ लाख २७ हजार ६५० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार आणि १८ दुचाकी असा एकूण १५ लाख ६० हजार ८९८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.