पहिल्या दिवशी १९ उमेदवारी उर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:36+5:302020-12-24T04:13:36+5:30
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी आठ तालुक्यांत १९ अर्ज दाखल झाले, ...
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी आठ तालुक्यांत १९ अर्ज दाखल झाले, तर सहा तालुके निरंक राहिले. अंतिम तारीख ३० डिसेंबर असली तरी या दरम्यान तीन सार्वजनिक सुट्ट्या राहणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता फक्त चार दिवस बाकी असल्याने दिवसेंगणिक गर्दी वाढणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना ज्या प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे, तो वर्ग व्यवस्थित लिहिणे. अजार्वर आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करणे, मतदार यादीतील अनुक्रमांक अचूक लिहिणे, अर्जदाराचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याची खातरजाम करणे, अनामत रक्कम भरणे, झिरो बॅलन्सचे पासबुकची सत्यप्रत किंवा नवीन पासबुकची झेरॉक्स जोडणे महत्त्वाचे आहे. याशिवाय अर्जदाराने गुन्हेगारी, अपत्य, मालमत्ता व शौचालयाचे घोषणापत्र सर्व योग्य ठिकाणी स्वाक्षरीनिशी सादर केल्याची अर्ज दाखल करण्यापूर्वी खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय राखीव जागांसाठी अर्ज सादर करीत असल्यास जात प्रमाणपत्र किंवा समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोहोच व हमीपत्र जोडणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अर्ज छाननी दरम्यान रद्द होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
याशिवाय अर्ज सादर करताना उमेदवाराला शेड्यूल बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडावी लागते. यापूर्वी मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया असताना काही उमेदवारांनी अशाच प्रकारचे बँक खाते काढले होते व नंतर आयोगाद्वारा निवडणूक रद्द करण्यात आली. हे पासबुकदेखील झिरो बॅलन्स करून व बँकेकडून तसे अपडेट करून त्याची सत्यपत्र जोडता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
बॉक्स
सहा तालुक्यांमध्ये उमेदवारी अर्ज निरंक
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहिल्या दिवशी म्हणजेच २३ डिसेंबरला अमरावती तालुक्यात ३ उमेदवारी अर्ज, भातकुली १, तिवसा ४, दर्यापूर १, मोर्शी१, अंजनगाव सुर्जी २, अचलपूर २, व चांदूरबाजार तालुक्यात ५ अर्ज दाखल झालेले आहेत. याशिवाय वरूड, धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याचे संबंधित तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.