महाराष्ट्रातून धावणाऱ्या २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:49+5:302021-05-06T04:13:49+5:30

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून ...

21 trains running from Maharashtra canceled till June 30 | महाराष्ट्रातून धावणाऱ्या २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

महाराष्ट्रातून धावणाऱ्या २१ रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

Next

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बाेर्डाने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल २१ गाड्या रद्द केल्या आहेत. १० मे ते ३० जूनपर्यंत या गाड्या बंद राहणार असून, आरक्षण तिकिटांचे रिफंड रेल्वे स्थानकाहून परत मिळेल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

डीआर ते पीव्हीआर (०१०२७), पीव्हीआर ते डीआर (०१०२८), डीआर ते एसएनएसआय (०१०४१), एसएनएसआय ते डीआर (०१०४२), डीआर ते एसएनएसआय (०११३१), एसएनएसआय ते डीआर (०११३२), सीएसएमटी ते जीडीजी (०११३९), जीडीजी ते सीएसएमटी (०११४०), नागपूर ते कोल्हापूर (०१४०३), कोल्हापूर ते नागपूर (०१४०४), मुंबई ते कोल्हापूर (०१४११), कोल्हापूर ते मुंबई (०१४१२), सीएसएमटी ते पुणे (०२०१५), पुणे ते सीएसएमटी (०२०१६), पुणे ते नागपूर (०२०३५), नागपूर ते पुणे (०२०३६), पुणे ते नागपूर (०२०४१), नागपूर ते पुणे (०२०४२), सीएसएमटी ते बीआयडीआर (०२०४३), बीआयडीआर ते सीएसएमटी (०२०४४), सीएसएमटी ते मनमाड (०२१०९), मनमाड ते सीएसएमटी (०२११०), मुंबई ते अमरावती (०२१११), अमरावती ते मुंबई (०२११२), पुणे ते नागपूर (०२११३), नागपूर ते पुणे (०२११४), मुंबई ते सुरत (०२११५), सुरत ते मुंबई (०२११६), पुणे ते अमरावती (०२११७), अमरावती ते पुणे (०२११८), डीआर ते एसएनएसआय (०२१४७), एसएनएसआय ते डीआर (०२१४८), मुंबई ते नागपूर (०२१८९), नागपूर ते मुंबई (०२१९०), मुंबई ते लातूर (०२२०७), लातूर ते मुंबई (०२२०८),पुणे ते अजनी (०२२२३) अजनी ते पुणे (०२२२४),पुणे ते अजनी (०२२३९), अजनी ते पुणे (०२२४०), मुंबई ते जालना (०२२७१) जालना ते मुंबई (०२२७२) या गाड्या १० मेपासून धावणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

Web Title: 21 trains running from Maharashtra canceled till June 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.