बडनेऱ्यात २८ कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती; अहवालाअंती होणार कारण स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:27 PM2021-01-09T19:27:52+5:302021-01-09T19:31:31+5:30

bird flu Update : बर्ड फ्लूची धास्ती नागरिकांमध्ये असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्या मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली.

28 hens slaughtered in Badnera, fear of bird flu; The reason for the end of the report is clear | बडनेऱ्यात २८ कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती; अहवालाअंती होणार कारण स्पष्ट

बडनेऱ्यात २८ कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती; अहवालाअंती होणार कारण स्पष्ट

googlenewsNext

अमरावती - दोन दिवसांत येथील दत्तवाडी परिसरातील २८ कोंबड्या दगावल्या. सद्यस्थितीत बर्ड फ्लूची धास्ती नागरिकांमध्ये असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्या मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली.

जुन्या वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण २८ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निमकर, बाळू ठवकर यांनी बडनेऱ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली. डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी सहकाऱ्याला पाठवून कोंबड्यांच्या नाकावाटे व गुदद्वारातून स्वॅब घेण्यास सांगितले. सदर नमुने अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली.

 दूषित पाणी प्यायल्याचा अंदाज

अचानकपणे दगावलेल्या त्या २८ कोंबड्यांनी पांढरी शौच केल्याने नाना प्रश्न उपस्थित झाले. दूषित पाणी प्यायल्यानेदेखील पांढरी शौच येऊ शकते, असा कयास कोंबडीपालकांनी व्यक्त केला. तथापि, बर्ड फ्लूचा धोका काही राज्यांत बळावल्यावरून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

Web Title: 28 hens slaughtered in Badnera, fear of bird flu; The reason for the end of the report is clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.