लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस स्मृतिदिनानिमित्त रविवारी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर सेवा कालावधीत शहीद झालेल्या वीरांना मानवंदना देण्यात आली. ४१६ पोलीस शहिदांचे स्मरण करून त्यांच्या नावाच्या यादीचे आदराने वाचन करण्यात आले.पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्ट्रीने राज्यभरात पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानवंदना देऊन विविध उपक्रम राबविले गेले. याअंतर्गत पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर रविवारी सकाळी पोलीस स्मृतिदिनी शहिदांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, पोलीस आयुक्त संजयकुमार वाबिस्कर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, एसआरपीएफचे समादेशक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व प्रदीप चव्हाण उपस्थित होते. वर्षभरात ज्या शूर पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्मांचे स्मरण यावेळी करण्यात आले.प्रमुख पाहुणे व उपस्थितांनी मुख्यालयाच्या प्रांगणातील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले. तिन्ही पोलीस पथकाचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक कनोजिया यांनी केले.या शहिदांना आदरांजलीखल्लार ठाण्याचे पोलीस शिपाई महादेव फुबाजी कोरडे (ब.नं.३६५)आसेगाव ठाण्यातील पोलीस शिपाई रामराव झिंगुजी ढोले (ब.नं.१४२०)परतवाडा ठाण्याचे पोलीस हवालदार अब्दुल कलीम अब्दुल कदीर (ब.नं.१५३१)पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई दिगांबर नारायण भटकर (ब.नं.१३२५)शिरजगाव कसबा ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश प्रल्हाद गायकवाड (ब.नं.७९१)चांदूर रेल्वे ठाण्यातील पोलीस नाईक सतीश शरद मडावी (ब.नं.१५८९)शहिदांच्या जीवनपटावर कार्यक्रमफे्रजरपुरा, राजापेठ व बडनेरा हद्दीत राहणारे शूरवीर ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकले, तेथे त्यांच्या जीवनपटावर कार्यक्रम घेण्यात आले. या शहिदांच्या बलिदानाबाबत पोलीस अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून गौरवपर कार्यक्रम घेण्यात आले.
४१६ शूरवीरांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:52 AM
पोलीस स्मृतिदिनानिमित्त रविवारी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर सेवा कालावधीत शहीद झालेल्या वीरांना मानवंदना देण्यात आली. ४१६ पोलीस शहिदांचे स्मरण करून त्यांच्या नावाच्या यादीचे आदराने वाचन करण्यात आले.
ठळक मुद्देपोलीस स्मृतिदिन : मुख्यालयाच्या मैदानावर आयोजन