(लोगो)
अमरावती : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत येथील हिंदू स्मशान संस्थेला सुविधा निर्मितीसाठी ५० लाखांचा निधी देण्यास मंगळवारच्या आमसभेत मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या निधीमधून तिसरी गॅस दाहिनी उभारता येणार नसल्याची अट टाकण्यात यावी, असे महापौरांनी स्पष्ट केले.
शंकरनगरातील स्मशानभूमीमध्ये कोरोना रुग्णांसाठी विद्युत दाहिनी उभारणीसाठी नागरिकांचा विरोध असल्याचे सांगितले. लोकांना त्रास होत असल्याने त्यांचा विरोध आहे. विलासनरातील स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा, असे सदस्य श्रीचंद तेजवानी म्हणाले. नवसारी येथील स्मशानभूमीत आणखी विकास करून येथे सुरक्षा रक्षक व नोंदी घेण्यासाठी एक कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रशांत डवरे यांनी केली.
मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन व वैयक्तिक शौचालय घोटाळ्याचा अहवाल अपूर्ण असल्याने येत्या आमसभेत ठेवण्यात यावा, असे महापौरांनी सांगितले.