- संदीप मानकरअमरावती : यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस थांबल्यानंतरही परतीच्या दमदार पावसामुळे काही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्यास मदत झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८५.१० टक्के पाणीसाठा आहे. एकूण २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ९२.७७ टक्के पाणीसाठा आहे. ४७६ लघु प्रकल्पांत ७२.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२२०.१५ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा २६४४.४८ दलघमी आहे. त्याची टक्केवारी ८२.१२ टक्के एवढी होते. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ७२.७३ टक्के, अरुणावती १५.९७ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा ६९.०६ टक्के, वान १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पांत ८२.११ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९७.८३ टक्के पाणीसाठा आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांची गेट अद्यापही उघडेच आहे. २४ मध्यम प्रकल्पांची स्थिती ?अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पांत ९९.७४ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा १०० टक्के, पूर्णा ९९.२१ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पांत १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.९१ टक्के, वाघाडी ९४.६३ टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगांव ९९.१२ टक्के, निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ८१.०९ टक्के, उमा ६६.८७ टक्के, घुंगशी बॅरेज ८६.५७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९०.३३ टक्के, सोनल १०० टक्के, एकबुर्जी ८४.६३ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी ५६.४८ टक्के, मन १०० टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चार प्रकल्पांची सहा गेट तर बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकल्पांचे गेट उघडेच आहे.
पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 6:48 PM