राजकीय व्यक्तीच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न : छत्रीतलावातील काम संशयाच्या भोवऱ्यात लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्री तलावातील गाळ व चिला काढण्याचे सुमारे १ कोटी रूपयांचे काम संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. स्थायी समितीनेही या कामावर आक्षेप घेतला असून काम सुरू केल्यावर हा प्रस्ताव आणण्याची गरजच काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने छत्री तलावातील गाळ काढण्याबाबत प्रशासन तत्पर असले तरी ही तत्परता इतर कामांत का नाही, असा प्रश्न उपस्थित करून १ कोटीच्या कामाबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. १ कोटीचे हे काम विनानिविदा आणि कार्यारंभ आदेशाविना दिल्याने संशयात भर पडली असून एका राजकीय व्यक्तिला खुश करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील दोन एजन्सींना शनिवारी त्वरेने मशिनरीज पुरविण्याबाबत पत्र देण्यात आले, ही संशयाची बाब आहे. निविदा न काढता ज्या दोन कंपन्यांना महापालिकेने कामे दिलीत, त्या कंपनी वा एजन्सीला गाळ व चिला काढण्याच्या कामाबद्दल कसे माहित झाले, असा स्थायी समिति सभापतींना पडलेला सवाल आहे. तब्बल १ कोटींच्या कामाबद्दल निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी अगदी वेळेवर हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला गेला. मात्र, त्याला स्थायीने मंजुरी दिली नाही. छत्री तलावातील गाळ व चिला काढण्याच्या कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी मंगळवारी ठेवण्यात आला होता. मात्र, पाहणीसाठी तो थांबविण्यात आला होता. स्थायीच्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय होईल.-तुषार भारतीय, स्थायी सभापतीराजकीय दबाव याप्रकरणी महापालिका प्रशासनावर राजकीय दवाब आल्याने असंवैधानिक मार्गाने व विनानिविदा आणि कार्यारंभ आदेशविना कामाला सुरूवात करण्यात आली. पावसाळा आणि आधीच ठरलेले दर या कुबड्यांचा आधार घेतला गेला. एकूण प्रशासकीय मान्यतेपैकी गाळ काढण्याकरिता १ कोटी रुपये ठेवण्यात आले आहे.पावसाळा तोंडावर असल्याने गाळ व चिला काढण्याचे काम युद्धस्तरावर करणे आवश्यक असल्याने ते तातडीने हाती घेतल्याचा दावा महापालिकेच्या बांधकाम विभागाने केला आहे.
अबब ! एक कोटींचा गाळ
By admin | Published: May 26, 2017 1:36 AM