आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावने ऑनलाईन परीक्षेसाठी केलेल्या करारनाम्याचा आधार घेण्यात
येणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत एजन्सी नेमण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
कोराेनाचा नवा स्ट्रेन बघता, संत गाडोबाबा अमरावती विद्यापीठाने प्रचलित आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या परीक्षांची तयारी सुरू केली आहे. तूर्त शासनाकडून महाविद्यालयीन परीक्षांबाबत कोणतीही गाईडलाईन नाही. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती बघता, जानेवारी महिन्यातही कॉलेज सुरू होणार नाही, असे प्रथमदर्शनी दिसून
येते. परिणामी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने शैक्षणिक कॅलेंडरनुसार परीक्षा, निकाल जाहीर करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे हिवाळी २०२० परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी
एजन्सी नियुक्तीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. उन्हाळी २०२० ऑनलाईन परीक्षेत उडालेला गोंधळ लक्षात
घेता, पुन्हा अशी नामुष्की विद्यापीठावर येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
---------------------
पेपर सेटरची शनिवारी बैठक
हिवाळी परीक्षेच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पेपर सेटरची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी आयोजित केली आहे. प्रथम वर्ष वगळता अन्य सत्राच्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा घेण्यात येणार आहे.
पेपर सेटरचे पॅनल तयार होताच त्यांना नियुक्ती आदेश दिले जातील, अशी माहिती आहे. फेब्रुवारीअखेर अथवा
मार्च २०२१ मध्ये हिवाळी परीक्षा घेण्यात येतील, अशी तयारी आहे.
---------------------
कुलगुरूंच्या मान्यतेनंतर ई-निविदा प्रक्रियेला वेग
हिवाळी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्तावाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मान्यता प्रदान केल्यानंतर पुढील प्रवासाला वेग येणार आहे. ई-निविदा समिती, तांत्रिक समितीचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर निविदेचा प्रारूप, अटी व शर्ती निश्चित होतील. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेत करारनाम्याबाबत एकमत होईल. नंतरच एजन्सी नियुक्तीसाठी ई-निविदा राबविली जाणार आहे.
---------------------------
राज्य शासनाने परीक्षांविषयी नवे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले नाही. मात्र, विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार हिवाळी २०२० परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार ऑनलाईन परीक्षांचे संचलनासाठी एजन्सी नेमली जाईल. कुलगुरूंच्या संमतीनंतर ई-निविदा राबविली जाणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ