अमरावती : जुन्या बायपास मार्गावरील राजासाहेब बार ॲन्ड रेस्टारंटमध्ये चोरी करून लाखो रुपयांची दारू लंपास करणाऱ्या दोन आरोपींना राजापेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. राकेश रमेश ठाकूर (रा. छत्रीतलाव) व सोपान आडे (रा. जेवडनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्ह्यातील ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी जय कडू व त्याचे अन्य साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
नरेंद्र गोपाळराव देशमुख (४०, रा. अशोक कॉलनी, मोर्शी रोड) यांच्या मालकीचा जुन्या बायपास मार्गावरील राजासाहेब बार ॲन्ड रेस्टारंट हे प्रतिष्ठान फोडून चोरांनी तब्बल २लाख ८७ हजार ३७१ रुपयांची विदेशी दारु चोरून नेली. या घटनेच्या अनुषंगाने राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, चोरांनी सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या डिव्हीआर बॉक्स सुध्दा चोरल्याचे आढळून आले. नरेंद्र देशमुख यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केली. पोलीस तपासानंतर राकेश रमेश ठाकूर नामक इसम हा राजासाहेब बार येथील चोरीची दारु विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील दारुच्या मालाची पाहणी केली असता चोरी गेलेल्या दारूच्या पावट्याच्या बॅच क्रमांक व राकेशजवळ दारुच्या पावटयांचा बॅच नंबर सारखाच असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी राकेशची कसून चौकशी केली असता, जय कडु व सोपान कडू यांनी दारुचा माल दिल्याची माहिती पुढे आली. यावरून पोलिसांनी जय व सोपान यांना अटक केली. कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ व राजापेठचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेालिस उपनिरीक्षक गजानन काठेवाड, पोलिस हवालदार दीपक सराटे, अतुल संभे, दानिश शेख, राहुल ढेगेकर, अमोल खंडेझोड यांच्या पथकाने केली.
बॉक्स
पेट्रोल पंपावरील सिसिटिव्हीत झाले आरोपी कैद
लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्याने आरोपींनी राजासाहेब बार फोडण्याचा ठरविले. आरोपींनी बार फोडून दारुसह डिव्हीआर सुध्दा चोरून नेला. त्यामुळे पोलिसांना आरोपींचा सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आजुबाजुच्या परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी जय कडू, सोपान कडू व त्याचे दोन अन्य साथीदार हे घटनेच्या दिवशी रात्री १वाजताच्या सुमारास जुन्या बायपास मार्गावरील पेट्रोल पंपावर गेल्याचे आढळून आले. तेथील सिसिटिव्ही कॅमेर्यात ते कैद झाले. यावरून पोलिसांनी तपासाची सुत्रे हलविली. बार फोडल्यानंतर आरोपींनी डिव्हीआर सुध्दा चोरला आणि तो कुठेतरी फेकून सुध्दा दिला. च्या परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी जय कडू, सोपान कडू व त्याचे दोन अन्य साथीदार हे घटनेच्या दिवशी रात्री १ वाजताच्या सुमारास जुन्या बायपास मार्गावरील पेट्रोल पंपावर गेल्याचे आढळून आले. तेथील सिसिटिव्ही कॅमेर्यात ते कैद झाले. यावरून पोलिसांनी तपासाची सुत्रे हलविली. बार फोडल्यानंतर आरोपींनी डिव्हीआर सुध्दा चोरला आणि तो कुठेतरी फेकून सुध्दा दिला.