सारां,श बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:21 AM2021-02-06T04:21:53+5:302021-02-06T04:21:53+5:30

ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी पालकांवर भुर्दंड अमरावती : शिक्षकांनी ऑनलाईन क्लासदरम्यान दिलेल्या वर्कशिट पाल्यांकडून करवून घेऊन त्या गुगल क्लासरूमध्ये ...

All in all, good news | सारां,श बातम्या

सारां,श बातम्या

googlenewsNext

ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी पालकांवर भुर्दंड

अमरावती : शिक्षकांनी ऑनलाईन क्लासदरम्यान दिलेल्या वर्कशिट पाल्यांकडून करवून घेऊन त्या गुगल क्लासरूमध्ये अपलोड करायच्या आहेत. त्यासाठी पालकांकडे स्कॅनर, संगणक, प्रिंटर या सर्व बाबी असणे आवश्यक राहते. त्यामुळे पाल्यांची ऑनलाईन परीक्षा पालकांनाच द्यावी लागत आहे.

-------------------

वरूड तालुक्यातील विद्युत रोहित्र कुचकामी

वरूड : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र निकामी झाले आहेत. दारे सताड उघडी असलेल्या डीबीकडे महावितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या विद्युत घटकांपासून जिवाला धोका निर्माण झाला आहे

-----------------------------

राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

पुसला : अमरावती-पांढुर्णा महामार्गावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी आंदोलन केल्यानंतर डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे..

-------------------------

चांदूर बाजार शहरात कचरा रस्त्यावर

चांदूर बाजार : शहरात नगरपालिकाद्वारे अनेक चौक व प्रभागांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना कचरा एकत्रित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असताना शहरातील अनेक भागांमध्ये कचरापेटीबाहेर केरकचरा टाकण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

------------------

तळेगाव येथील रेती तस्करांवर कारवाई केव्हा?

तळेगाव दशासर: परिसरातील नदी-नाल्यांतून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू करण्यात आले आहे. घुईखेड रोडवरील नाल्यातून दिवस-रात्र बैलगाडीने राजरोस रेती उत्खनन केले जात आहे. हाय-वेवरून बस स्टँड मार्गे या बैलगाड्या रेतीसहित गावात शिरतात. त्याकडे महसूलने दुर्लक्ष चालविले आहे.

--------------------

फोटो पी ०५

श्रेया चांडक

ब्राह्मणवाडा थडी : येथील श्रेया रवींद्रकुमार चांडक हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश संपादन केले. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.

---------

फोटो पी ०५ सराफ

नितीन सराफ

अंजनगाव सुर्जी : स्थानिक राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक नितीन उल्हासराव सराफ यांची इतिहास संकलन संस्थेच्या महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सराफ हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य आहेत.

----------------

प्लास्टिकचा वापर, पाच जणांकडून दंड वसूल

अमरावती : राजकमल चौक, गांधी चौक, नमुना गल्ली परिसरात प्लास्टिक जप्ती व कोविड-१९ जनजागरण मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत भाजीपाला व फळविक्रीची हातगाडी लावणाऱ्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे कागदी पिशव्या आढळून आल्या. मास्क न लावणाऱ्या पाच नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे एकूण २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक पिशवीचा वापर करीत असल्याबाबत एका दुकानमालकाला पाच हजार रूपये दंड करण्यात आले. ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम काढण्यात आली.

Web Title: All in all, good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.