तिवसा : नगर पंचायतच्यावतीने शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांना झालेल्या नवीन भाजी मांडीत ईश्वरचिठ्ठीनुसार जागा वाटप करण्यात आल्या,मात्र या ठिकाणी भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय होत नसल्याने आम्हाला जुना नगरपंचायत कार्यालयासमोर व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांनी तिवसा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे..तर आज शहरात प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जागा न दिल्यास भाजीपाला बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला
सध्या कोरोनाचे रुग्ण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वाढत असून जिल्हाधिकारी यांनी कोविड अंतर्गत निर्बन्ध कडक केले असून गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत होत असलेली गर्दी बघता तिवसा नगरपंचायतने काल दुपारी सर्व भाजी विक्रेत्यांना चिठ्ठीद्वारे भाजी व्यवसाय करण्याकरिता जागा वाटप केल्या, मात्र नगरपंचायतने नेमून दिलेली जागा व्यवसायासाठी पूरक नाही, शहराच्या मुख्य मार्केट पासून लांब असल्याने या ठिकाणी व्यवसाय होत नाही, त्यामुळे आमच्यावर व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. तेव्हा आठवड्याभरात येत असलेले दोन बाजाराच्या दिवशी बाजार मंडित व्यवसाय करू, मात्र उर्वरित पाच दिवस आम्हाला जुन्या ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावि
अशी मागणी निवेदनाद्वारे सर्व भाजी विक्रेत्यांनी केली यावेळी पंकज चिंतारे,आदेश बिजवे,युसूफ शहा,रोशन शिरभाते,प्रदीप सुरजुसे,बाळू डोळस,कैलास मकेश्वर, सुरेंद्र मकेश्वर,प्रशांत बाखडे, किशन बंसोड,धीरज टाले,राजेश शहा,राजेश धडांगे, महेश बेलसरे, विशाल दुर्गे यासह भाजी विक्रते उपस्थित होते.