रूग्णांची सेवा : जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य तालुक्यांची स्थिती
अमरावती : ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ९४ रुग्णावाहिकांसोबतच मेळघाटात ५ दुचाकीवरून रुग्णांना सेवा दिली जात आहे.
प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून रुग्णांना सेवा देण्यात येते. जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय येतात, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र चालवली जातात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३३० आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. या आरोग्य केंद्रामार्फत ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा दिली जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. या आरोग्य केंद्र अंतर्गत गावात सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्रांना एक रुग्णवाहिका आहे. या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी सेवा देतात तसेच इतरही स्टाॅपवरही या वाहनाचा वापर होतो. जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून मेळघाटात २२ भरारी पथकही कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्येसुद्धा आरोग्य अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मेळघाटातील टेब्रुसोंडा, काटकुंभ, हतरू, बैरागड, हरिसाल या आरोग्य केंद्रात आराेग्य रुग्णवाहिकेसोबतच दुचाकाीने आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. चारचाकी व १०८ रुग्णाहिका ६ अशा रुग्णवाहिका सेवेत आहेत.
बॉक्स
आरोग्य विभागाकडील वाहने
५ दुचाकी
९४ चारचाकी वाहने
बॉक्स
दुचाकीच्या माध्यमातून केली जाणारी कामे
धारणी व चिखलदरा या आदिवासीबहुल भागातील ५ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गरोदर माता, शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची गावोगावी जाऊन आरोग्य तपासणी व अन्य रूग्णाची तपासणी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत केली जाते.
बॉक्स
रुग्णवाहिकेतून केली जाणारी कामे
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णांपैकीमार्फत गावोगावच्या रुग्णांची ने-आण करण्यात येते तसेच मेडिसीन नेण्यासाठीही वापर केला जातो.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतीलमधील गावांना सेवा देण्यासाठी जाताना, लस नेण्यासाठी या रुग्णवाहीकेचा वापर होत असतो.
कोट
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात ५९ एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिली जाते. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका रुग्णांसाठी महत्त्वाच्या ठरतात.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद