- जितेंद्र दखनेअमरावती - महिला व बालविकास विभाग व मार्फत मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी या योजना राबविण्यात येतात त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी या योजनेतून अमरावती जिल्ह्यातील ९८५ मुलींच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता याप्रमाणे ४५ लाख रुपये जमा केले असून उर्वरित मुलींनासुद्धा लवकरच याचा लाभ दिला जाणार आहे.
शासनाने यापूर्वी पूर्वी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी असलेली माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता लेक लाडकी या योजनेत बदलली आहे. या योजनेअंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मुलगी आणि आई यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता असे असे एकूण १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यांवर जमा करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ज्या पालकांनी आपल्या मुलींच्या नावाची नोंदणी महिला बालविकास विभागाकडे केली आणि सर्व प्रमाणपत्राची पूर्तता केली अशा ८९५ मुलींना ४५लाख रुपयांचे वाटप केले असून उर्वरित पात्र मुलींनासुद्धा टप्प्याटप्प्याने रक्कम देण्यात येणार आहे. किंवा ज्या पालकांनी अद्यापही आपल्या मुलीचे नावे नोंदणी केले नसतील त्या पालकांनी तात्काळ अंगणवाडी सेविकांकडे आपल्या बालिकांचे नाव नोंदणी करून शासनाकडून मिळणाऱ्या एक लाख एक हजार रुपये रकमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी केले आहे. लेक लाडकी योजनेचे जिल्ह्यात अतिशय उत्तम काम सुरू असून महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. तेव्हा पालकांनी आपल्या मुलींची नावे अंगणवाडी सेविकाकडे नोंदवावी.- संजीता मोहपात्रा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती. तालुकानिहाय लाभार्थीअमरावती १२२,भातकुली ९८, दर्यापूर ३१, तिवसा ५५, वरुड ११०, मोर्शी ८१,चांदूर रेल्वे ९५, धामणगाव रेल्वे ३७,नांदगाव खंडेश्वर ८२, अचलपूर ७५, अंजनगाव सुर्जी ४४,चांदूरबाजार ४२,धारणी ०३, चिखलदरा २० एकूण ८९५