मुुलाच्या अपहरण प्रकरणात आणखीन मास्टर माइंड महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:15 AM2021-02-25T04:15:07+5:302021-02-25T04:15:07+5:30
अमरावती पोेलिसांच्या माहितीवरून अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई अमरावती : शारदानगर येथील चारवर्षीय मुलाच्या अपहरणप्रकरणी रोज नवीन नावे समोर येत ...
अमरावती पोेलिसांच्या माहितीवरून अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : शारदानगर येथील चारवर्षीय मुलाच्या अपहरणप्रकरणी रोज नवीन नावे समोर येत आहेत. या गुन्ह्यात हीना शेख हिच्यासोबत सक्रिय असलेल्या आणखी एका मास्टर माइंड महिलेस अमरावती पोलिसांच्या माहितीवरून अहमदनगर स्थाानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी अहमदनगरच्या मुकुंदनगरातून अटक केली आहे.
रूखसार शेख (२८, रा. मुकुंंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. सदर आरोपी ही पोलीस कोठडीत असलेली हीना शेखची जवळची नातेवाईक असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुलाची आजी मोनिका लुणीया व हीना शेखची पीसीआरदरम्यान अमरावती पोलीस कसून चौकशी करीत आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात सहा आरोपींना तपास पथकाने अटक केली आहे. सर्व आरोपींची २८ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी महिला आरोपींना सिटी कोतवाली ठाण्यात ठेवले असून बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांना राजापेठ ठाण्यात आणण्यात आले होते. तपास पथकाने आरोपीच्या घेतलेल्या पीसीआरदरम्यान सदर गुन्ह्यात रूखसार शेखचे नाव पुढे आले आहे. मोनिकाच्या सांगण्यावरून हीना शेख व रूखसार शेख या गुन्ह्यात सक्रिय होत्या. पीसीआरमध्ये रूखसारचे नाव समोर येताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी ही माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली. त्यानंतर पाटील यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या तपास पथकाला सूचना देऊन आरोपीला अटक करण्यास सांगितले. सदर आरोपीला या गुन्ह्यातील पुढील तपास करण्यासाठी अमरावती येथे आणणार आहेत.
बॉक्स:
दोन दुचाकी, कार जप्त
चारवर्षीय मुलाचे अपहरण केल्यानंतर सदर गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व कार अहमदनगर व अमरावती पोलिसांच्या पथकाने जप्त केल्या आहे. आणखीन एक कार ताब्यात घेणार असल्याचे अहमदनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले.
बॉक्स:
दादी निघाली हीना शेखची नातेवाईक
मुलाची दादी शारदानगर रहिवासी मोनिका लुणीया ही पोलीस कोठडीत आहे. दादी ही हीना शेखची जवळची नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तसेच रूखसार शेख हीसुद्धा हीनाची नातेवाईक असल्याने ती दादीच्यासुद्धा नात्यात येते. त्यामुळे सर्वांनी मिळूनच हा पाच कोटींच्या खंडणीसाठी कट रचल्याचे समोेर आले आहे.
बॉक्स:
दोन आरोपी सायनवरून मुंबईत पसार
यातील मास्टर माइंड पोलीस रेकॉर्डवरील सराईत इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार पुणे येथील अज्जू अजीज याला पोलिसांचा सुगावा लागताच सायन मार्ग दोघेही मुंबईत पसार झाले आहे. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले.