महसूल विभागाच्या पर्जन्य नोंदीनुसार, सर्वाधिक पावसाची नोंद आसेगाव महसूल मंडळात झाली. या मंडळात ४५ मिमी पाऊस झाला. तळेगाव मोहना मंडळात ३२ मिमी पावसाची नोंद झाली. चांदूर बाजार मंडळात २५ मिमी, तर बेलोरा मंडळात २४ मिमी पाऊस झाला आहे. शिरजगाव कसबा मंडळात १५ मिमी, तर ब्राम्हणवाडा थडी मंडळात ११ मिमी पाऊस झाला. १० जूनला सर्वांत कमी पावसाची नोंद करजगाव मंडळात झाली आहे. याठिकाणी ७.२० मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात १ ते १० जूनपर्यंत मंडळनिहाय चांदूरबाजार ४३.०१ मिमी ,बेलोरा ४१.०४ मिमी, ब्राम्हणवाडा थडी ४६ मिमी, शिरजगाव कसबा ३० मिमी, करजगाव १९.२० मिमी, आसेगाव ६७.२० मिमी, तळेगाव मोहना मंडळात ३२ मिमी पाऊस झाला. दोन दिवसांच्या सरासरी पावसातही आसेगाव मंडळात सर्वाधिक, तर करजगाव मंडळात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीही सुरुवातीच्या पावसाची नोंद करजगांव मंडळात सर्वांत कमी होती.