बडनेऱ्यात कुस्ती स्पर्धेत १० लाखांच्या बक्षिसांची लयलूट
By admin | Published: January 12, 2016 12:14 AM2016-01-12T00:14:02+5:302016-01-12T00:14:02+5:30
युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने युवादिनाचे औचित्य साधून १२ व १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.
पत्रपरिषद : दोन दिवस राष्ट्रीय स्तरावरील मल्लांची मांदियाळी
अमरावती : युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने युवादिनाचे औचित्य साधून १२ व १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी मल्लांना प्रोत्साहनपर बक्षीसांसह १० लाखांच्या बक्षिसांची लयलूट करता येईल, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक आ. रवी राणा यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, अमरावती शहर तालीम संघटना यांच्या देखरेखीत बडनेरा जुनिवस्ती स्थित सावता मैदानावर उद्या मंगळवारी १२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता कुस्ती स्पर्धेचे उद्घघाटन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा या पहिल्यांदाच बडनेरा शहरात होत असून स्पर्धेकरीता लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे आ. राणा म्हणाले. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, मल्ल नासीर खान, विक्रम जाधव हे देखील येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. देश, राज्य स्तरावरील सुमारे ५०० मल्ल या स्पर्धेत येतील. ३०० मल्लांसोबत थेट संवाद करण्यात आल्याचे विदर्भ केसरी संजय तिरथकर यांनी सांगितले.
नोकरीचा निर्णय मल्लांसाठी सुखद
अमरावती : कुस्ती हा खेळ महाराष्ट्राच्या मातीतला असून या खेळाला राजाश्रय मिळण्याची गरज आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी मल्लांना आता पोलीस खात्यात नोकरी दिली जाईल, अशी घोषणा करुन मल्लासाठी हा निर्णय सुखद असल्याचे संजय तिथतकर यांनी सांगितले. बडनेऱ्यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे म्हणजे नवोदित कुस्ती खेळाडुंना संधी देणे होय, असे आ. राणा म्हणाले. प्रमुख लढतीतील मल्लांना रोख एक लाख रुपये व चांदीची गदा भेट दिली जाणार असून युवा स्वाभिमान केसरी गदा असे या बक्षीसाला नाव ेदेण्यात आले आहे. लाल मातीत होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मल्लांच्या कर्तबगारी आणि खेळ बघण्याची संधी दर्शकांना मिळणार आहे. ज्येष्ठ कुस्रीगिरांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी जिल्हाभरातून कुस्तीगिरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी विदर्भातील खेळाडुला महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकाविता आला नाही. त्यामुळे कुस्तीला राजाश्रय मिळाला. गाव, शहरात मोठ्या प्रमाणात कुस्तीगिर तयार होतील, पत्रपरिषदेला आ. रवीे राणा, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विदभर के सरी संजय तिरथकर, आदींची उपस्थिती होती.