भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 02:38 PM2021-08-18T14:38:07+5:302021-08-18T14:38:43+5:30

Amravati News एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना येथे घडली. चक्क ह्यतू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज मागणी आरोपीने केली.

Awful! He said to a simple girl, 'You are a call girl, then give me pleasure' .. | भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' ..

भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' ..

Next
ठळक मुद्देतरुणाविरुद्ध तक्रार दाखल



लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: प्रेमप्रकरणातून महिला, मुलीच्या विनयभंगाचे प्रकार समाजात नवीन नाहीत. ब्रेकअप झाल्यानंतरही प्रेयसीचा पाठलाग करण्याच्या घटनादेखील नित्याच्याच. मात्र, एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर येथे घडली. चक्क ह्यतू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज मागणी आरोपीने केली.


नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक २७ वर्षीय तरुणी एका ठिकाणी कलाकुसरीचे धडे देते. ती १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास तेथे हजर असताना आरोपी पवन दाढे (२७, रा. फुबगाव) हा तिच्या दुकानात शिरला. त्याने अतिशय निर्लज्ज भाषेत शरीरसुखासाठी त्याला मुलीची आवश्यकता असल्याचे पीडिताला सांगितले. या अचानक घडलेल्या घटनेने ती तरुणी नखशिकांत हादरली. उपस्थित तरुणी, महिलांनी तिला धीर दिला. घटनेबाबत पोलीस तक्रार नोंदविण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी पवन दाढे याच्याविरूद्ध कलम ४५१, ३५४ (आय), (१) (२) अन्वये गुन्हा दाखल केला.


गुन्हा दाखल झाल्याबरोबर आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविण्यात आले. मात्र, तो घरी आढळून आला नाही. आरोपीचा लवकरच अटक करण्यात येईल.
- हेमंत ठाकरे,

ठाणेदार, नांदगाव खंडेश्वर

Web Title: Awful! He said to a simple girl, 'You are a call girl, then give me pleasure' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.