एमसीव्हीसी प्रवेशाकडे पाठ, तिसऱ्या फेरीत २३५८ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:06+5:302020-12-14T04:29:06+5:30

अमरावती : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेत यंदा किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) च्या प्रवेशाकडे बहुतांश विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ...

Back to MCVC Admission, 2358 vacancies in the third round | एमसीव्हीसी प्रवेशाकडे पाठ, तिसऱ्या फेरीत २३५८ जागा रिक्त

एमसीव्हीसी प्रवेशाकडे पाठ, तिसऱ्या फेरीत २३५८ जागा रिक्त

Next

अमरावती : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेत यंदा किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) च्या प्रवेशाकडे बहुतांश विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तिसऱ्या फेरीत २३५८ जागा रिक्त असल्याची माहिती आहे. मात्र, आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल आहे.

अमरावती महानगरात अकरावीच्या एमसीव्हीसी प्रवेशाकरिता जागांची क्षमता ३०२० आहे. आतापर्यंत दुसऱ्या प्रवेशफेरीत ६६२ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहे. तिसऱ्या प्रवेशाची गुणवत्ता यादी १५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. अद्यापही २३५८ जागा रिक्त असून, यावर्षीसुद्धा एमसीव्हीच्या भरपूर जागा रिक्त राहतील, असे चित्र आहे. दहावीनंतर एमसीव्हीसी अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो, तर आयटीआयलाही हीच पात्रता असते. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला गर्दी होेत नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे आयटीआयमध्ये आतापर्यंत १७ टक्के जागांवर ऑनलाईन प्रवेश निश्चित झाले आहेत.

आयटीआय प्रवेशाची तिसरी फेरी सुरू झाली आहे. सोमवार, मंगळवारी चौथ्या फेरीला प्रारंभ होईल. आतापर्यंत वायरमन, फिटर, डिझेल मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, मोटर मॅकेनिकल, स्टेनो या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे प्रवेशाअंती चित्र आहे.

-----------------------

आयटीआयकडे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. काही ट्रेड दरवर्षी हाऊसफुल्ल असतात. रोजगाराचा संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी आयटीआय शिक्षण घेत आहेत.

- के.एस. वानखडे, प्रवेश प्रक्रिया समन्वयक, आयटीआय. अमरावती.

--------------------

Web Title: Back to MCVC Admission, 2358 vacancies in the third round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.