मतपेटी, मतदान यंत्रे सील करणारी राजमुद्रा हटविली
By admin | Published: October 16, 2014 11:17 PM2014-10-16T23:17:59+5:302014-10-16T23:17:59+5:30
निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा.
गणेश वासनिक - अमरावती
निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा. मात्र यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत सामान्य मुद्रा असलेले चिन्ह सील करताना वापर होत आहे.
१९५२ ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतयंत्रे, पॅकेट, मतपेटी आदी साहित्यावर मोहोर लावून ते सील करताना राजमुद्रा असलेले चिन्ह असणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सील करताना सामान्य चिन्ह असलेली 'एम' मुद्रा वापरण्यात आल्याने याचा अर्थ काय समजावे, हा प्रश्न पडला आहे. राजमुद्रा हटविण्याचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्यांनी घेतला हे कळेनासे झाले आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.