सावधान : इंडो पब्लिक स्कूल परिसरात चार बिबट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:12 PM2018-06-06T22:12:12+5:302018-06-06T22:13:17+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रातील मार्डी रोडस्थित इंडो पब्लिक स्कूलच्या मागील परिसरात मादी बिबटासह तीन छाव्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे जगंलाशेजारील शाळा-महाविद्यालये, पोल्ट्रीफार्म, गोटफार्म व शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील मार्डी रोडस्थित इंडो पब्लिक स्कूलच्या मागील परिसरात मादी बिबटासह तीन छाव्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे जगंलाशेजारील शाळा-महाविद्यालये, पोल्ट्रीफार्म, गोटफार्म व शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
मार्डी रोड परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. आठवडाभरापूर्वी इंडो पब्लिक स्कूलच्या मागील तारेच्या कुंपणानजीकच मादी बिबटासह तीन छावे मुक्तसंचार करताना आढळले. याची माहिती मिळताच वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, वनपाल विनोद कोहळे, रेस्क्यू पथकातील वनरक्षक अमोल गावनेर व एका वनमजुराने इंडो पब्लिक स्कूल परिसरात पाचारण केले. पाण्याच्या व शिकारीच्या शोधात असलेल्या बिबटांना वनकर्मचाºयांनी जंगलात हाकलून लावले. वन्यप्राणी शाळेच्या आवारापर्यंत पोहोचल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यासंबंधाने शाळा प्रशासन व पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बिबट हा मांजरवर्गीय प्रजातीचा वन्यप्राणी असून तो श्वान व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहचू शकतो. इंडो पब्लिक स्कूलच्या आवाराला चार ते पाच फुटांचे तारेचे कुंपण आहेत. मात्र, त्या कुंपणातून बिबट आत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने वनविभाग सतर्क झाला असून, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी वनविभागाने शाळा प्रशासनासह जंगलशेजारी राहणाºयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बिबट मांजरवर्गीय वन्यप्राणी
वाघ, बिबट, रानमांजर हे मांजरवर्गीय वन्यप्राणी असून, बिबट हा शिकारीच्या शोधात चार ते पाच फुटापर्यंत सहज उडी घेऊ शकतो. त्यामुळे शाळेच्या आवारात बिबट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनकर्मचारीही सांगत आहे. विशेष म्हणजे बिबटचे आवडते खाद्य श्वान, रानडुक्कर, बकरी, कोंबड्या, ससे आहेत. मोठ्या प्राण्यांवर सहज अटॅक करता येत नसल्यामुळे लहान प्राण्यांना बिबट भक्ष्य बनवितो.
हे ठिकाण वनविभागाच्या निगराणीत
इंडो पब्लिक स्कूल परिसरात बिबट आढळल्याने वनविभागाने या परिसरात गस्त वाढविली. जगंलाशेजारची घरे, शेती, फार्महाऊस येथे जाऊन तेथील रहिवाशांंना वन्यप्राण्यांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्डी रोड स्थित जंगलाशेजारी इंडो पब्लिक स्कूल, के.के. कॅमरेज, सेंट जार्ज शाळा, मंदिर, चर्च, अच्यूत महाराज हार्ट हॉस्पिटल व इंजिनीअरिंग कॉलेज आहे.
गोटफार्मचीही बकरी फस्त
बिबटाने दोन दिवसांपूर्वी एका शेतातील गोटफार्ममधील बकरी फस्त केली. अजय लहाने यांच्या शेतात हा प्रकार घडल्याचे वनकर्मचारी सांगत आहे. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकºयाला नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अशा आहेत वनविभागाच्या सूचना
वन्यप्राणी पाणी व शिकारीच्या शोधात बिबट या परिसरात येत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. वन्यप्राणी दिसताच श्वानांचे भुंकणे सुरु होते. अशावेळी कर्कश आवाज किंवा फटाके फोडून वन्यप्राण्यांना हाकलून लावले जाऊ शकते. सायंकाळनंतर परिसरात बॅटरीचा प्रकाश केल्यास व लाईट सुरू ठेवल्यास वन्यप्राणी प्रकाशामुळे आत येणार नाही. पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबट आत येऊ शकतात. सायंकाळनंतर घराबाहेर पडू नका, वन्यप्राण्यांना हुसकावून लावू नका, वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वनकर्मचाऱ्यांनी तेथील रहिवाशांना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करावे. सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत वन्यप्राणी बाहेर पडत आहे. अशावेळी सावध राहावे. आदी सूचना वनविभागाने तेथील रहिवाशांना दिल्या आहेत.
या परिसरात बिबट आढळल्याचा कॉल होता. वनकर्मचाºयांनी आढावा घेऊन नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली. दिवसा लोकांच्या गर्दीमुळे बिबट येण्याची शक्यता कमी असते. सायंकाळनंतर नागरिकांनी बाहेर पडू नये.
- हेमंत मीणा, उपवनसरंक्षक
शाळा परिसरात मादीसह तीन बिबट आढळले होते. शाळा प्रशासनाने व वनविभागाने काळजी घेणे आवश्यक आहे. शाळेने पाळीव प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवावी. मुलांच्या डब्ब्यातील टाकाऊ अन्न पदार्थांची योग्य विल्हेवाट लावावी.
- स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक