भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अमरावती ग्रामीणकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:37+5:302021-09-13T04:12:37+5:30

Photo from Ravindra Wankhade वनोजा बाग प्रतिनिधी दि१२. मुंबई -साकीनाका पोलीस स्टेशन अंतर्गत महिलेवरील अमानुष बलात्कार आणि तिची केलेली ...

Bharatiya Janata Party Women's Front warns of intense agitation from Amravati Grameen | भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अमरावती ग्रामीणकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अमरावती ग्रामीणकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

Photo from Ravindra Wankhade वनोजा बाग प्रतिनिधी दि१२.

मुंबई -साकीनाका पोलीस स्टेशन

अंतर्गत महिलेवरील अमानुष बलात्कार

आणि तिची केलेली विटंबना आणि तिचा झालेला मृत्यू

आणि अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर

तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत नंदरून येथील अल्पवयीन (वय वर्ष १७)

मुलीवर बलात्कार करून ती ७ महिन्याची गर्भवती राहिली आणि तिने गळफास लावून घेतला आणि या

मुलीच्या आत्महत्येस जबाबदार नराधम अशा अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा गुन्हा ताबडतोब फास्टट्रॅक कोर्टात घ्यावा याकरिता अंजनगाव येथील पोलीस स्टेशनला स्थानिक ठाणेदारांना

महिला जिल्हाध्यक्षा अर्चनाताई पखान यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार रमेश बुंदीले,नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, ग्रामीणच्या महिला आघाडी अध्यक्ष सुषमाताई गावंडे,शहराचे अध्यक्ष जयशजी पटेल,सरचिटणीस संदीप राठी,राजेंद्र रेखाते,महिला सरचिटणीस कुसुमताई बेलसरे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनीताताई मुरकुटे,

मीनाताई बुंदीले,उपनगराध्यक्ष सविताताई बोबडे, संगीताताई पाटील, विद्याताई मनोज घडेकर,सविताताई गीते,दीपालीताई घाटे,निताताई मोगरे,संगीताताई मेन पतंजली,सुमनताई कावरे,नगरसेविका लताताई मुरकुटे,शिलताई सगणे,दीपालीताई पवार,अरुणाताई इंगळे,अरुणाताई ईखार,विमलताई माकोडे,वर्षाताई बरब्दे,स्नेहा बरब्दे,आरतीताई काकड,मंदाताई साळी,दिशा मोगरे,दीपालीताई कोकाटे , रेखाताई गिरहे,मानवी मनोज घडेकर,अर्चनाताई वाट,संगीताताई पोटदुखे,संगीताताई उके आदी शहर आणि ग्रामीणच्या महिला पदाधिकारी,कार्यकर्ते, तसेच विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते,पत्रकार सुनीलभाऊ माकोडे, मनोहरभाऊ मुरकुटे,मयूर रॉय,महेंद्र भगत निलेशभाऊ दुबे,गजाननभाऊ चांदूरकर उपस्थित होते.

यावेळी ठाणेदार वानखडे यांनी तसेच इतर महिला अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांपर्यंत आमचे म्हणणे पोहोचवून योग्य तो न्याय पीडितेला मिळेल असे आश्वासन दिले.

Web Title: Bharatiya Janata Party Women's Front warns of intense agitation from Amravati Grameen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.