वृक्षप्रेमींनी जगवलेल्या झाडाचा केला वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:37+5:302021-07-03T04:09:37+5:30

पुसला : येथील वृक्षप्रेमींनी झाडे लावून त्यांचे संगोपन करून वाढलेल्या झाडांचा अनोख्या पध्दतीने केक कापून वाढदिवस साजरा केला. ...

Birthday of a tree saved by arborists | वृक्षप्रेमींनी जगवलेल्या झाडाचा केला वाढदिवस

वृक्षप्रेमींनी जगवलेल्या झाडाचा केला वाढदिवस

Next

पुसला : येथील वृक्षप्रेमींनी झाडे लावून त्यांचे संगोपन करून वाढलेल्या झाडांचा अनोख्या पध्दतीने केक कापून वाढदिवस साजरा केला. पाच वर्षांपासून झाडे लावून त्यांचे संगोपण ते करीत आहे. आतापर्यंत रीठा, पिंपळ, गुलमोहर, सुभाबूळ, करंजी आदी ७० च्या वर झाडांचे नित्यक्रमाणे संगोपन करण्यात आले.

यावेळी पुसला ते मोवाड रस्त्यावर नवदाम्पत्य भाग्यश्री वाघाडे व दिनेश वाघाडे, नेहा पाटणकर व मनीष पाटणकर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. स्मशानभूमी भागात वृक्षप्रेमीनी जगवलेल्या झाडांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. झाडे जगवण्याला चालना मिळावी या हेतूने उपक्रम राबवित असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले. यावेळी शरद वरुडकर, अंकुश कुंभारे, बबलू हेडाऊ, दिनेश वाघाडे, त्रिशूल दिवाण, मनीष पाटणकर, सुनील पखाले, आकाश पखाले, विनोद कुहिटे, सुयोग ढोंगे, मनीष कुंभारे, देवानंद वरुडकर, सारंग पाटणकर, चेतन कुंभारे, ओम पाटणकर, देवांश लिखार उपस्थित होते.

Web Title: Birthday of a tree saved by arborists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.