मुख्यालयी राहणे बंधनकारक : अन्यथा कारवाईचा बडगालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘अप-डाऊन’ करणे आता महागात पडणार आहे. जे मुख्याधिकारी मुख्यालयी राहणार नाही, अशांवर शिस्तभंगाचा बडगा उगारण्याचा पुनरूच्चार राज्य सरकारने केला आहे. नगरविकास विभागाने १९ मे रोजी पुन्हा परिपत्रक काढून मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयातच उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. या निर्णयाने मुख्याधिकाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’ संस्कृतीला ब्रेक लागणार आहे.प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मुख्य अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. मुख्य अधिकारी हा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासकीय प्रमुख आहे. नागरिकांना जीवनावश्यक व दैनंदिन स्वरुपाच्या कामाच्या निमित्ताने संबंधित नागरी स्थानिक संस्थेशी सातत्याने संबंध येत असतो. मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्यथा शिस्तभंगविषयी कार्यवाही प्रस्तावित करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारीसूचनांचे पुनरूच्चार करण्यात येत असून सर्व नगर परिषद,नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नगरपरिषद मुख्याधिकारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहतील याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकासने दिल्या आहेत.
मुख्याधिकाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’ला ब्रेक
By admin | Published: May 26, 2017 1:49 AM