संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:05+5:302021-02-24T04:14:05+5:30
नांदगाव पेठ : देशमुख लॉननजीक गणेशनगर येथील एका महिलेने पती व सासरच्या मंडळीविरुद्ध शारीरिक व मानिसक छळाची तक्रार नांदगावपेठ ...
नांदगाव पेठ : देशमुख लॉननजीक गणेशनगर येथील एका महिलेने पती व सासरच्या मंडळीविरुद्ध शारीरिक व मानिसक छळाची तक्रार नांदगावपेठ पोलिसांत दिली. त्यावरून लक्ष्मण विजय अवधाते (३६), सचिन विजय अवधाते (४०) व दोन महिला यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४९८ अ, ३४ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------
किराणा दुकानदाराची दुचाकी पळविली
अमरावती : किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या केवल कॉलनी येथील दुकानात गेलेल्या व्यक्तीची एमएच ३२ एपी ६०११ क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २० फेब्रुवारी ही घटना घडली. रोशन नरेंद्र मानकर (२८, रा. एबी रेसिडेन्सी, शेगाव-रहाटगाव रोड) यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली.
--------------
भावाच्या डोक्यावर चाकूने वार
अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावाची लहान मुले पैसे मागत असल्याने चिडून जाऊन आरोपीने त्याच्या भावाच्या डोक्यावर चाकूने वार केला. नागपुरीगेट पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सलीम अली मुजाहिद अली (६०, रा. वॉटर सप्लाय, लालखडी) यांच्या तक्रारीवरून आबिद अब्दुल मजिद याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.
----------
विनामास्क इसमांविरुद्ध गुन्हा
वलगाव : प्रवासादरम्यान विनामास्क आढळलेल्या तिघांविरुद्ध संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा वलगाव पोलिसांनी सोमवारी नोंदविला. सतीश महेश वर्मा (२८, रा. हनुमाननगर), नरेश जगदेव मेश्राम (४०, रा. समतानगर, वलगाव) व अमोल अरुण बंड (४५, रा. पूर्णानगर) अशी त्यांची नावे आहे.
------------
दुचाकीच्या धडकेत इसम जखमी
अमरावती : समर्थ हायस्कूल शाळेनजीक एमएच १८ एएच ८८७४ क्रमांकाच्या दुचाकीला एमएच २७ एएक्स ६६५१ क्रमांकाच्या दुचाकीने ओव्हरटेकच्या नादात धडक दिली. त्यामुळे प्रकाश राजपूत (रा. पार्वतीनगर नं. २) यांच्या पायाला मार लागला. याप्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी पंकज राजपूत (३०) यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार दिली.
-----------
झेंडा चौकात महिलेचा विनयभंग
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकातील रहिवासी महिलेला आरोपी १४ फेब्रुवारीपासून तीन मोबाईल क्रमांकांवरून वारंवार कॉल व छुपा पाठलाग करीत होता. याप्रकरणी पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
----------
शहर कोतवाली पोलिसांची हॉटेलवर कारवाई
अमरावती : शहर कोतवाली पोलिसांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल राधेय ईन या प्रतिष्ठानाविरुद्ध सोमवारी कारवाई केली. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. संचालक पीयूष नरेंद्र राठी (३१, रा. जीवनछाया कॉलनी) याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८ सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला.
---------
भातकुली पोलिसांची पाच जणांविरुद्ध कारवाई
भातकुली : स्थानिक पोलिसांनी रविवारी बस स्थानकानजीक पाच जणांविरुद्ध कारवाई केली. प्रदीप सुखदेवराव गोरे (३१, रा. धामणगाव गढी), भाऊराव मिताराम मोकळे (४०, रा. पुसदा), संतोष मिताराम सुक (५५, रा. रोहणा), साजिद खान फारूख खान (३४, रा. लालखडी) व शिवा श्रीराम दहीकर (२८, रा. हत्तीघाट, ता. चिखलदरा) यांचा यात समावेश आहे. त्यांनी मास्क लावलेले नव्हते.
----------