अमरावती : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत मत्स्य व्यावसायिकांना पाच पिंजऱ्याचा वापर करून मत्स्य संवर्धन करण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यालयाकडून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
...........
सलग तीन दिवस बँका बंद
अमरावती : या आठवड्यातील तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार प्रभावित झाले आहेत. नाताळची शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी बँकांना सुट्टी होती. २६ डिसेंबरला महिन्याचा चौथा शनिवार व रविवारी सुटी त्यामुळे सलग तीन दिवसांनंतर थेट सोमवारपासूनच बँकांचे व्यवहार सुरळीत होणार आहेत.
.........
स्थायी समितीची सभा गुरुवारी
अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी विविध विषयाला अनुसरून घेण्यात येणार आहे. ही सभा दुपारी १ वाजता डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
...................................................................
शिष्यवृत्ती परीक्षा मार्च महिन्यात
अमरावती : राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी होणार आहे. आठवीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील. शाळांची ऑनलाईन आवेदन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ डिसेबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन आवेदन करता येणार आहे.
..........
एचएमटी, सीईटी परीक्षेची घोषणा जानेवारीत
अमरावती : नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए जेईई मेंन्स परीक्षेची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सीईटी सेलकडून एमएचटी (सीईटी) परीक्षेच्या तारखांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात सीईटी सेलचे नियोजन सुरू असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
.............................