अमरावती : झेडपीचे सीईओ अविशांत पंडा यांनी मंगळवारी अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले व अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
................................
अपंग बेरोजगाराचे कर्ज मंजूर करा
अमरावती : अपंग बेरोजगाराचे कर्ज प्रकरण मंजूर करावे, अन्यथा बँकांना घेराव घालण्याचा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
..................................................................
झेडपीची सरळ सेवा भर्ती परीक्षा घ्या
अमरावती : जिल्हा परिषद सरळ सेवा भर्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी सीईओं अविशांत पंडा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
.....................................
अंजनगाव ते दर्यापूर प्रवासी निवाऱ्यांची वानवा
अंजनगाव सुजी : दर्यापूर मार्गावरील विविध गावांच्या थांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने बसेसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना भर उन्हातच उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी निवारे उभारण्याची मागणी होत आहे.
..............................................
बचत भवन येथे कोरोना चाचणी शिबिर
अमरावती : एमपीएससीची परीक्षा होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या सुरू आहे. चाचणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी सकाळपासून लाईन लागली होती.