थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:47+5:302021-05-15T04:12:47+5:30

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरातील विविध भागांत सॅनिटायझर फवारणी अभियान सुरू केले आहे. देशपांडे वाडी, विश्वकर्मा मंदिर ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरातील विविध भागांत सॅनिटायझर फवारणी अभियान सुरू केले आहे. देशपांडे वाडी, विश्वकर्मा मंदिर व महानगरप्रमुख पराग गुडघे यांच्या नेतृत्वात महिला आघाडी शहरप्रमुख रेखा खारोडे यांनी परिसरात सॅनिटायझर फवारणी माेहीम राबविली.

.....................................................

मालखेड येथे ४१ हजारांची दंड वसुली

चांदूर रेल्वे : मालखेड रेल्वे ग्रामपंचायत परिसरात कोरोना नियंत्रण व उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत दोन दिवसांत ४१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत ग्रा.पं. पदाधिकारी व अधिकारी आदींनी सहभाग घेतला.

.........................................................

शासकीय कार्यालयात शुकशुकाट

अमरावती : कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्याने शासकीय कार्यालयांत शुकशुकाट पसरला आहे. कार्यालय बंद असल्यामुळे अभ्यागतांची वर्दळ बंद झाली आहे.

.........................

भाजीपाल्याची दामदुप्पट दराने विक्री

अमरावती : कोरोना रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. याचाच गैरफायदा घेत काही भाजीविक्रेते दामदुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री करत आहे.

.....................................

निमखेड ते चौसाळा रस्ता उखडला

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार ते चौसाळा हा रस्ता उखडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर नादुरुस्त रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.