थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:05+5:302021-06-26T04:11:05+5:30
अमरावती: जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी १४ पंचायत समितीचा गटविकास अधिकारी यांचेकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी त्यानी महत्वाचे विषयावर ...
अमरावती: जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी १४ पंचायत समितीचा गटविकास अधिकारी यांचेकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी त्यानी महत्वाचे विषयावर सूचना दिल्यात.
.....................................................
मिनीमंत्रालयात केरकचरा साचला
अमरावती: जिल्हा परिषद सिंचन विभागा लगत असलेल्या खुल्या जागेवर केरकचऱ्याचे ढिस लागले आहे.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे परिसर स्वच्छ केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.
.................................
सोयाबीन बियाण्याची मागणी वाढली
अमरावती ; सध्या खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला.अनेक शेतकऱ्याच्या सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
.........................
शहरातील उद्यानात वाढली रेलचेल
अमरावती; शहरातील महापालिकेचे उद्याने कोरोना व त्यापार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक़डाऊनमुळे बंद होती.परिणामी आता अनलॉकनंतर ही उद्याने सुरू झाली आहेत.त्यामुळे या ठिकाणी नागरिक,बच्चेकंपनीची रेलचेल वाढल्याचे दिसून येत आहे.
.....................
गर्ल्स हायस्कुल ते बियाणी चौक रस्ता उखडला
अमरावती ; गर्ल्स हायस्कुल कडून बियाणी चौकाकडे जाणारा डांबरी रस्ता उखडला आहे.या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे रस्ता दुरूस्तीची मागणी वाढली आहे.