अमरावती : नवीन दिव्यांग अधिनियमातील कायद्यानुसार दिव्यांग तक्रार निवारण समिती गठित करावी, अशी मागणी अपंग जनता दल संघटनेने निवासी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
.............................
वलगाव येथील पेढी नदीला पूर
अमरावती : गत दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वलगाव येथून वाहणाऱ्या पेढी नदीला पूर आला होता. पूर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
..........................................
प्रवासी निवाऱ्याची लागली वाट
अमरावती : वलगाव ते परतवाडा मार्गावर असलेल्या प्रवासी निवाऱ्यांची दैना अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना बसण्याचीही व्यवस्था नाही.
................................
बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.मात्र अद्याप बारावीचा निकाल जाहीर झाला नाही.त्यामुळे बारावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
.....................
बसस्थानकांवर वाढली प्रवाशांची वर्दळ
अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता परिवहन महामंडळाकडून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकावर सध्या प्रवाशांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.