संक्षिप्त पान २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:20+5:302020-12-24T04:13:20+5:30
----------- वरूडच्या उत्तरेश्वर संस्थानमध्ये चोरी शेंदूरजनाघाट : वरूड येथील उत्तरेश्वर संस्थानात मंदिराचा गाभारा व त्यापुढील खोलीचे कुलूप तोडून २२५० ...
-----------
वरूडच्या उत्तरेश्वर संस्थानमध्ये चोरी
शेंदूरजनाघाट : वरूड येथील उत्तरेश्वर संस्थानात मंदिराचा गाभारा व त्यापुढील खोलीचे कुलूप तोडून २२५० रुपयांची साडेतीन तांब्याची भांडी लंपास करण्यात आली. २१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. योगिराज टाकरखेडे (४५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------
रस्त्यावर टँकर, जिवे मारण्याची धमकी
जरूड : गावात रस्त्यावर टँकर लावल्याबद्दल जाब विचारला म्हणून चालक बलदेव ऊर्फ नितीन रमेश राऊत याने संदीप विनायकवराव देशमुख (४७) व इतर उपस्थितांना शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. वरूड पोलिसांनी भादंविचे कलम ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------
दुचाकीच्या धडकेत इसम ठार
खोलापूर : नजीकच्या धामोरी गावानजीक एमएच २७ ए १४८६ क्रमांकाच्या दुचाकीवर स्वार धर्मराज श्रीधर ईसळ (रा. कसबेगव्हाण) व अक्षय पवार यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. यात धर्मरााज इसळ यांचा मृत्यू झाला. उमाकांत इसळ (३०) यांच्या तक्रारीवरून
खोलापूर पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला. २१ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास खोलापूर ते अमरावती मार्गावर हा अपघात घडला.
-------------
मुलीला अज्ञात इसमाने पळविले
परतवाडा : कांडली येथून १५ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने २० डिसेंबर रोजी पळविल्याची तक्रार २२ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली. त्यावरून परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
-----------
कविठा शिवारातून बोअरची मोटर लंपास
परतवाडा : नजीकच्या कविठा शिवारात सतीश सोपानराव बलोदे (५०, रा. करजगाव) यांच्या शेतातील १० हजारांची बोअरवरील मोटर व सहा हजारांची केबल असा १६ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-----------
शिवारातून ट्रॅक्टर ट्रॉली लंपास
अचलपूर : परतवाडा-अमरावती मार्गावर भूगाव शिवारातून ट्रॉलीसह एमएच २७ यू ३४७४ क्रमांकाचा ट्रॅक्टर २२ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्याने पळवून नेला. याप्रकरणी राजू बळवंतराव ठाकरे (५४, रा. तळेगाव मोहना) यांनी सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------