नगरपरिषद निवडणुकीसाठी दीड कोटींचे बजेट

By admin | Published: February 27, 2016 12:14 AM2016-02-27T00:14:03+5:302016-02-27T00:14:03+5:30

जिल्ह्यातील नऊ नगपरिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी सुमारे १ कोटी ४१ लाख ८६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Budget for one and a half crore for municipal elections | नगरपरिषद निवडणुकीसाठी दीड कोटींचे बजेट

नगरपरिषद निवडणुकीसाठी दीड कोटींचे बजेट

Next

निवडणुकीची पूर्वतयारी : प्रशासनाचे नियोजन सुरू
अमरावती : जिल्ह्यातील नऊ नगपरिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी सुमारे १ कोटी ४१ लाख ८६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांचे प्रभाग रचनेचे काम पूर्ण करून गुगल ड्राईव्हवर केएसएल फाईलद्वारे अपलोड केले आहे.
जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांचा डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ मध्ये कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यासाठी काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीही सुरू झाल्या आहेत. प्रशासनानेही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा नुकताच निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडून आढावा घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त कामे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. सोबत मोबाईल अँड्राईड अप्लीकेशनचा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. निवडणुका पेपरलेस करण्याचा प्रयत्न प्रशासनाने या माध्यमातून सुरू केला आहे. जिल्ह्यातील ९ नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. याबाबत प्रगतीची माहिती राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम सुरू झाले आहे. याबाबत नगरपरिषद विभागाचे अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Budget for one and a half crore for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.