पुन्हा घरफोडी, शहर असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:33+5:30
छत्रसालनगरात चोरी, ७३ हजारांचे दागिने लंपास : गाडगेनगर ठाण्यांतर्गत छत्रसालनगरात अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तीन हजार रुपये रोख, असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. उर्मिला सुखदेव यादव (४०) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी घरात झोपल्या असता, त्यांना दार उघडलेले दिसले. पंलगाखाली ठेवलेली लोखंडी पेटी त्यांना दिसली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फाॅरेस्ट कॉलनीनजीक खंडेलवाल नगरात भरदिवसा अज्ञाताने घरफोडी करून दागिन्यासह नगदी रोख असा ५ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला. अक्षय कांचन बनसोड (३०) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.
सदर महिला आईच्या उपचाराकरिता बुधवारी सकाळी कुलूप लावून एका खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. आलमारीतून ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, अंगठी, पाटल्या, इतर दागिने व नगदी १५ हजार असा ५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.
छत्रसालनगरात चोरी, ७३ हजारांचे दागिने लंपास : गाडगेनगर ठाण्यांतर्गत छत्रसालनगरात अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तीन हजार रुपये रोख, असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. उर्मिला सुखदेव यादव (४०) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी घरात झोपल्या असता, त्यांना दार उघडलेले दिसले. पंलगाखाली ठेवलेली लोखंडी पेटी त्यांना दिसली नाही. पेटीतील सोने चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
गुरुदेवनगरात तीन घरे फोडली
गुरुकुंज मोझरी : चोरांनी गुरुदेवनगर परिसरातील तीन घरांना लक्ष्य करून हजारोंचा ऐवज लांबविला. बुधवारी रात्री येथील मोहन भुसारी यांच्या घरी भाड्याने राहत असलेले अविनाश साखरवाडे हे दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून साहित्याची नासधूस केली. लहान मुलांचे सोन्याचे दागिने, नथ, चांदीच्या तोरड्या लंपास केल्या. लगतच्या प्रफुल्ल भीमरावजी वानखडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरातून सोन्याचे मणी, चांदीच्या तोरड्या व नगदी ३० हजार रुपये लंपास केले. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त स्वगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या घराला चोराने लक्ष्य केले होते. काही दिवसांपूर्वी गुरुदेवनगरातील सचिन रायकर यांच्या घरून एलसीडी टीव्ही व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. नजीकच्या अविनाश बेले यांच्या शेतातून १४ हजार रुपये किमतीचे मोटरपंप लंपास केले होते. या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. मोझरी परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. ती कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात पोलिसांकडून गस्त घातली जात होती.