अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांची बोब
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मूग, उडीद, सोयाबीनची सन २०२०-२१ मध्ये विमा काढला होता. मात्र, काढणीच्यावेळी सततच्या पावसाने ते शेतातच जिरले. याची विमा प्रतिनिधींनी व कृषी विभागाने शेतात प्रत्यक्ष पाहणीदेखील केली. परंतु, नुकसानभराई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची बोंबाबोंब होत आहे.
पिकावर यलो व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीक नष्ट झाले. परंतु याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षीची विम्याची रक्कम आम्हाला द्यावी, त्यानंतर आम्ही यावर्षीचा विमा काढू, अशी भूमिका घेतली आहे.
लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिले खरे, मात्र तोंडाला पाने पुसली. यलो व्हायरसमुळे १०० टक्के पीक नष्ट झाल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आले होते. याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी पीक विमा मंजूर केले. तसेच आमदारांनी १५ दिवसांच्या आत पीक विमा मिळाला नाही तर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करू, असे म्हटले होते. मग कुठे घोडे अडले, अशी विचारणा शेतकरी करीत आहे.
गोवर्धन हरणे गावडगाव(हिंगणी) यांनी २०२०-२१ चा विमा काढला. परंतु अद्याप रक्कम मिळाली नाही. आम्ही वीस किलोमीटरहून अंजनगाव कृषी विभागात येतो. कृषी अधिकाऱ्यांना विचारतो आणि खाली हाताने परत जातो, हा मनस्ताप शेतकऱ्यांनाच का, अस सवाल त्यांनी केला आहे.
...........
महेंद्र बारब्दे, कुंभारगाव
मी गतवर्षीचा विमा काढला. परंतु विम्याची रक्कम मिळाली नाही. प्रधानमंत्र्याच्या घोषणेला विमा कंपनीत किंमत नसल्याचे यावरून दिसून येते.
...........
मोहन ठाकरे शेतकरी
आम्ही सोयाबीन, मूग, उडीद पिकाचा विमा काढला. हे पैसे आमच्या खिशातून गेले. परंतु वर्ष उलटून सुद्धा विम्याचा लाभ मिळालेला नाही.
रमेश सावळे, यांचा फोटो सामाजिक कार्यकर्ते