शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

चंद्रशेखर व्यंकट यांनी रोवला आधुनिक विज्ञानाचा पाया

By admin | Published: February 28, 2016 12:33 AM

पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जाताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला रामन स्प्रेट्रम तर, नव्या वर्षरेषांना रामन लाईन्स अशी नावे व या घटनेला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले.

राष्ट्रीय विज्ञान दिन : हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर अमरावती : पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जाताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला रामन स्प्रेट्रम तर, नव्या वर्षरेषांना रामन लाईन्स अशी नावे व या घटनेला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. आज जगभर ही नावे रुढ झाली असून या संशोधनाचे प्रणेते चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया रोवला, अशी माहिती रविवार २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. चंद्रशेखर व्यकंट यांचा जन्म इ.स. १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली येथे झाला. भौतिकशास्त्रात मद्रास येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यात काळात भारतात वैज्ञानिक संशोधनाला फारसा वाव नव्हता. त्यामुळे कलकत्याला अर्थखात्यात त्यांनी नोकरी मिळविली. परंतु रामन यांचा मूळचा पिंड विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्याचा होता. नोकरीत असतानाही ते सर्व फुरसतीचा वेळ विज्ञान संशोधन व अभ्यासात घालवित असत. अखेर सरकारी नोकरीत मन रमणे शक्य नसल्याने त्यांनी १९१७ मध्ये नोकरी सोडली व कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात (पलित प्राध्यापक) या पदावर तेथे अध्यापन व संशोधन कार्य सुरु केले. १६ वर्षे त्यांनी १९३३ पद भुशविले. १९२१ मध्ये ब्रिटिश साम्राज्यांतर्गत विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून रामन उपस्थित राहिले. या निमित्ताने त्यांना युरोप व इंग्लडच्या प्रवासाची संधी मिळाली. बोटीतून युरोपच्या वाटेवर असताना त्यांनी भूमध्य समुद्राचे स्वच्छ निळेशार पाणी पाहिले आणि सागर जलाच्या निळाईवर त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातूनच पुढे रामन परिणाम म्हणून जागतिक विज्ञान क्षेत्रात मान्यता पावलेल्या महत्त्वाच्या संशोधन कार्याचे बीज रुजून वाढीला लागले. त्यांनी संशोधन करिताना अनेक पारदर्शक वायू आणि घन पदार्थातून व द्रव पदार्थातून प्रकाश किरण आरपार जाऊ दिले. त्या किरणांच्या स्वभावधर्मात काय फरक पडतो यांचे संशोधन सुरु केले. त्यामध्ये पारदर्शक पदार्थातून प्रकाश किरण आरपार जातात. त्यांचे काही प्रमाणात इतर दिशांना इतरत्र विखरून बाहेर पडणाऱ्या पदार्थातून प्रकाश किरण आरपार जातात. त्यांचे काही प्रमाणात इतर दिशांना इतरत्र विखरून बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणांचा वर्णपट मूळच्या प्रकाश किरणांच्या वर्णपटापेक्षा वेगळा असतो. पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जात असतांना प्रकाश कणांची टक्कर झाल्यामुळे हा विखुरणारा प्रकाश निर्माण होतो व माध्यमाचे रेणू व प्रकाश कण यांच्यातील प्रक्रियेने नव्या वर्णरेषा निर्माण होतात, असे या घटनेचे स्पष्टीकरण रामन यांनी दिले. या शोधाने जगभऱ्याच्या विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)