अंबाडा येथे विकासकामांअभावी नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:04+5:302020-12-14T04:29:04+5:30

पान ३ मोर्शी : अंबाडा येथील रेंगाळलेली सर्व विकासकामे १० दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ...

Citizens suffer due to lack of development work in Ambada | अंबाडा येथे विकासकामांअभावी नागरिक त्रस्त

अंबाडा येथे विकासकामांअभावी नागरिक त्रस्त

Next

पान ३

मोर्शी : अंबाडा येथील रेंगाळलेली सर्व विकासकामे १० दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांसह प्रहारचे तालुकाप्रमुख मुन्ना ऊर्फ प्रीतम खेरडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

अंबाडा ग्रामपंचायत येथील विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष करीत असून, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊनही काहीच उपयोग झाला नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.

--------------

Web Title: Citizens suffer due to lack of development work in Ambada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.