अमरावती खड्ड्यांचे शहर

By admin | Published: September 27, 2016 12:16 AM2016-09-27T00:16:27+5:302016-09-27T00:16:27+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येत असलेले शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत.

City of Amravati potholes | अमरावती खड्ड्यांचे शहर

अमरावती खड्ड्यांचे शहर

Next

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघात घडण्याची प्रतीक्षा
संदीप मानकर अमरावती
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येत असलेले शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अमरावती खड्ड्यांचे शहर, अशी ओळख या शहराची झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असून रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. तरीही रस्ते का उखडले जातात, हा प्रश्न अंबानगरीच्या जनतेला पडला आहे.
अमरावती-नागपूर, अमरावती- परतवाडा हा राज्य महामार्ग आहे. स्थानिक शहरातून जाणारा रस्ता अमरावती मध्यवर्ती बस आगारापासून तर पंचवटी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर डांबरीकरण का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा रस्ता झाल्यानंतर पहिल्याच पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलखोल झाली आहे.
राजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ये-जा करणाऱ्या वाहनांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर असलेले खड्डे व त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनांचे किरकोळ अपघातही होत आहेत. राजापेठ चौकातील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. शनिवारी कोसळलेल्या पावसाचे पाणी या रस्त्यावरील खड्डयांमध्ये साचले आहे. यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.
अमरावती शहरातून जाणाऱ्या येथील विद्युतनगरपासून तर वलगावपर्यंत मुख्य महामार्ग हा अतिशय खराब झाला, असून या रस्त्याच्या मधोमद चाकोऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला असून याकरिता निधीच नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंबानगरीचे रस्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. हा विकास होणार केव्हा, असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)

अनेकदा अपघात, प्राणही गेले पण समस्या मात्र ‘जैसे थे’
नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो. मात्र, त्यानुसार सोयी पुरविल्या जात नाहीत. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा पाहता हेच का अमरावतीचे स्मार्टनेस, असा प्रश्न पडतोच. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झालेत. काही किरकोळ तर काही गंभीर अपघात झाले. अनेकांचे प्राणही गेलेत. कित्येकांना अपंगत्व आले. मात्र, तरीही शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या काही मार्गी लागत नाही.

Web Title: City of Amravati potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.