शहर काँग्रेसतर्फे शेतकरीविरोधी कायद्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:51+5:302021-06-21T04:09:51+5:30

अमरावती : भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते, खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी साजरा करण्यात ...

City Congress protests anti-farmer legislation | शहर काँग्रेसतर्फे शेतकरीविरोधी कायद्याचा निषेध

शहर काँग्रेसतर्फे शेतकरीविरोधी कायद्याचा निषेध

Next

अमरावती : भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते, खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी साजरा करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्त्वात शेतकरीविरोधी काळ्या कायद्याची होळी करण्यात आली,

शेतकरी कायदा अन् जनतेला काय फायदा, असा नारा लावत केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन काळे कायदे जसे की, एक देश एक बाजारपेठ कायदा-२०२०, करार शेती व्यवसाय कायदा २०२०, जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा २०२०ची होळी करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप हिवसे, अनिल माधोगडिया, सलीम बेग, सुनीता भेले, शोभा शिंदे, सुजाता झाड़े, प्रशांत डवरे, राजीव भेले, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, राजा बांगडे, नीलेश गुहे, अब्दुल रफीक, देवयानी कुर्वे, अर्चना सवई, जयश्री वानखडे, योगिता गिरासे, प्रशांत महल्ले, राजेश चव्हाण, झिया खान, करिमाबाजी, आस्मा परवीन, पुरुषोत्तम मुंधडा, रमेश राजोटे, राजेश चव्हाण, रज्जू बाबा, राजेंद्र भंसाली, अभिनंदन पेंढारी, संदेश जैन, हुसैन बगदादी, अतुल कालबेंडे, सलीम मीरावाले, मुकेश छांगाणी, शम्स परवेज, गुड्डू हमीद, असलम सलाट, जावेद साबीर, हाजी रफीक, गोपाल हिवराले, सादीक शाह, निसार मंसुरी, अजय छटवानी, देवेन्द्र पोहोकार, अशोक रेवस्कार, राजेश ठाकुर, ड़ॉ जुबैर अहमद, अरुण रामेकर, दीपक लोखंडे, फादर डेनियल, पंकज मेशराम, मतीन अहमद, मनीष पावडे, ज्ञानेश्वर मुंजाले, सोहन कुरील, भैय्यासाहेब निचल, समिउल्ला खान, आकाश तायडे, ओबीसी महिला अस्मा, श्याम खेरडे, हाजी रफिक, अनिल तायडे, रफीक चिकूवाले, राहुल विजयकर, रज्जू बाबा, मसरत अली, अब्दुल तालिब, अजूभाई, सुभाष कुथे, अरहिम खान, शेख हमिद, याकुब मामू, सुनील महल्ले, रशिद पठान, एकनाथ जुवार, अष्फाक खान, सुरेश कनोजिया, विशाल गुप्ता, ड़ॉ. बी. आर. देशमुख, अब्दुल नाईम, यासिर भारती आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: City Congress protests anti-farmer legislation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.