जिल्हातील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करा

By admin | Published: January 27, 2015 11:25 PM2015-01-27T23:25:01+5:302015-01-27T23:25:01+5:30

अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये वरली मटका, जुगार, देशी दारु, गावठी दारुचे अवैध धंधे फोफावले आहे. गांज्याची खुलेआम तस्करी सुरु आहे. अ‍ॅटो, ट्रकमध्ये केरोसीनचा सर्रास वापर सुरु आहे.

Close the illegal activities in the district permanently | जिल्हातील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करा

जिल्हातील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करा

Next

अमरावती : अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये वरली मटका, जुगार, देशी दारु, गावठी दारुचे अवैध धंधे फोफावले आहे. गांज्याची खुलेआम तस्करी सुरु आहे. अ‍ॅटो, ट्रकमध्ये केरोसीनचा सर्रास वापर सुरु आहे. रेशन दुकानातही धान्याचा काळाबाजार होत आहे हे सर्व प्रकार व अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्यात यावे, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना मंगळवारी देण्यात आले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे. वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगरातून दिवसभर गुटख्याची तस्करी होते. बस स्टॅण्ड परिसरातील दारु दुकानातून दारु वर्धेला सुटकेस मार्गे जाते. रेशन दुकानदारांनी भाड्यांनी परवान दिले आहेत. रेशन धान्याचा काळाबाजार होत आहे. ती दूकान तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली या सर्व प्रकाराला पोलीस उत्पादन शुल्क व प्रादेशिक परिवहन विभाग दोषी आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
परिसरात अवैध धंद्यामध्ये वाढ झाल्याने युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. अनेकांचे संसार व्यसनापायी काडीमोड होण्याच्या मार्गावर आहे. जुगारही येथे मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. आठ दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास जनआंदोलन करुअसा इशारा लोकजनशक्ती पार्टीचे विभागीय अध्यक्ष आनंद वरठे, जिल्हा संघटक हिरालाल मोहिते, तसेच ईम्रानोद्दीन, सुरेंद्र थोरात, राजेश श्रीवास, बाल्या घोरपडे, बाळू डूकरे, अचलपूर तालुका अध्यक्ष गजानन गवई, मोर्शी तालुका अध्यक्ष सुनील वानखडे, दर्यापूर तालुका अध्यक्ष हिरालाल इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहोड, अमरावती तालुका अध्यक्ष मंगेश घोडेस्वार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Web Title: Close the illegal activities in the district permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.