बंद संमिश्र मुद्दा इंधन दरवाढीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:36 PM2018-09-10T23:36:01+5:302018-09-10T23:36:56+5:30

पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तंूची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, मनसेसह इतर पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शहरात संमिश्र, तर ग्रामीणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Closed composite issue fuel price hike | बंद संमिश्र मुद्दा इंधन दरवाढीचा

बंद संमिश्र मुद्दा इंधन दरवाढीचा

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची हाक, अनेकांचे समर्थन : मनसेचे १० 'डिटेन'

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तंूची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, मनसेसह इतर पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शहरात संमिश्र, तर ग्रामीणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
जयस्तंभ चौकात सकाळी ९ वाजता माजी आ. रावसाहेब शेखावत, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांंनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला हारार्पण करून बाजारपेठ बंदचे आवाहन केले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने दुचाकी रॅली काढण्यात आली. दरम्यान अन्य पक्षाच्यावतीने देखील दुचाकी रॅली काढण्यात येऊन नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे तसेच व्यापाºयांनी त्यांची दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख बाजारपेठ कडकडीत बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान मनसेच्या १० कार्यकर्त्यांना 'डिटेन' करण्यात आले.
महागाईने सर्वसामान्यांचे जगणे महागले
अत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालय, बाजारपेठ बंद

प्रत्येक तालुक्यात काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा देत सकाळपासूनच बंद पाळला. बाजारपेठही सकाळपासून बंद होती.
पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या असताना केंद्र व राज्य शासन मौन पाळून आहे. साधारणत: मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या दरात २२१ टक्के, तर डिझेलच्या दरात ४४३ टक्क्यांनी वाढ केल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला. या वस्तूंवर अवास्तव कर लावल्यामुळेच किमती वाढलेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्यांचा हा आवाज केंद्र व राज्याच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी सोमवारच्या बंद शहरासह जिल्ह्यात पाळण्यात आला.
आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, वसंतराव साऊरकर, भैया पवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद ठाकरे, संजय वाघ, महिला काँग्रेस अध्यक्ष देवयानी कुर्वे, राजू भेले, बाबूसेठ खंडेलवाल, करीमाबाजी, वंदना थोरात, आनंद भंबोरे, अनिल माधोगडिया, चंद्रभागा इंगोले, राजा बांगडे, निजामभाई, अमोल ठाकरे, भाऊराव पोटे, योगिनी गिरासे, पद्मीनी जाधव, विद्याधर देशमुख, राहुल तायडे, सतीश कडू, विनय देशमुख, राजेश देशमुख, किशोर रायबोले, तन्वीर आलम, भैयासाहेब हाडोळे, गणेश पाटील, राजेंद्र कडू, विनिता गोपाल, वंदना सुराडकर, एजाज पहिलवान, समीर जवंजाळ, संजय मापले, दीपक सलुजा, श्यान खेरडे, गोपाल हिवराळे, आकाश तायडे, चेतन यादव, हेमंत ठाकूर, गजानन तायडे, मोंटू वाटकर, चेतन सरदार, सागे पटेल, कुबेर जाधव, बबलू बेलसरे आदींचा सहभाग होता.
बंदला या संघटनांचा पाठिंबा
काँग्रसने पुकारलेल्या सोमवारच्या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पेट्रोल पंप असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा असोसिएशन, संभाजी ब्रिगेड यासह अन्य पक्ष व संघटनांचा पाठिंबा असल्याचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी सांगितले.
दुचाकी रॅलीने बंदचे आवाहन
शहरात सकाळी शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डाव्या पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारा दुचाकी रॅली काढून शहर बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. बंददरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठा बंद होत्या.
निषेध, चक्काजाम, अनुचित प्रकार नाही
सोमवारच्या बंद दरम्यान शहरात बंद पाळण्यात आला. ग्रामीणमध्ये बंदचे पडसाद तीव्र उमटले. आंदोलनकर्त्यांनी शासन निषेधाच्या घोषणा देत चक्काजामही केला. मात्र, यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही, प्रत्येक आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. जो मार्ग सुरू होता, त्या मार्गाने बसची सेवादेखील सुरू होती.
वलगावला रास्ता रोको
महाराट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, ऐन्युला खान, वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात वलगावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. मार्गाच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागलेली होती.

Web Title: Closed composite issue fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.