जिल्हाधिकारी कार्यालय १०२, महापालिका ८५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:23 PM2019-04-01T23:23:22+5:302019-04-01T23:23:47+5:30
महानगरपालिकेने ३१ मार्चअखेर ३७ कोटी ९ लाख ६८ हजार ४८१ रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. ही टक्केवारी ८४.२५ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मार्चअखेर १०५ कोटी ८१ लाख २१ हजारांची करवसुली केली आहे. ही टक्केवारी १०२ आहे. विशेष म्हणजे, महापालिकाद्वारे यंदा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक गाठण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या उत्पन्नात ३८ लाखांनी भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरपालिकेने ३१ मार्चअखेर ३७ कोटी ९ लाख ६८ हजार ४८१ रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. ही टक्केवारी ८४.२५ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मार्चअखेर १०५ कोटी ८१ लाख २१ हजारांची करवसुली केली आहे. ही टक्केवारी १०२ आहे. विशेष म्हणजे, महापालिकाद्वारे यंदा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक गाठण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या उत्पन्नात ३८ लाखांनी भर पडली आहे.
मागील वर्षी महापालिकाद्वारे ३६ कोटी ७१ लाख ४४ हजार ५८८ इतका मालमत्ता कर वसूल झालेला होता. ही टक्केवारी ७७.७४ होती. यावर्षी मालमत्ता कराच्या वसुलीत ६.५० टक्क््यांनी वाढ झालेली आहे. ३१ मार्च या एकाच दिवशी ५ कोटी १० लाख २१ हजार २२४ रुपयांच्या मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. एकाच दिवशी मालमत्ता कर वसुलीचा हा उच्चांक आहे. मालमत्ता कर वसुलीमध्ये यावर्षी ८४.२५ इतकी वसुली झाली असून महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीमध्ये हा उच्चांक आहे. याबद्दल महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
अशी झाली जिल्हाधिकारी कार्यालयाची वसुली
अमरावती उपविभागाद्वारे ३९.७८ कोटी म्हणजेच १३२ टक्के, ४ कोटी ४० लाख म्हणजेच ३६ टक्के, दर्यापूर उपविभागाद्वारे ४ कोटी ८० लाख म्हणजेच ५० टक्के, चांदूर रेल्वे उपविभागाद्वारे ६ कोटी ५ लाख म्हणजेच ३९ टक्के, मोर्शी उपविभागाद्वारा २३ कोटी ८५ लाख म्हणजेच १४६ टक्के, अचलपूर उपविभागाद्वारे ७ कोटी ४२ लाख म्हणजेच ५५.७१ टक्के, धारणी उपविभागाद्वारे १२ कोटी २० लाख म्हणजेच १९३ टक्के, तर अमरावती जिल्हा कार्यालयाद्वारे ७ कोटी ५३ लाखांची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १०५ कोटी ८९ लाख म्हणजेच १०२.३६ टक्क्यांची वसुली करण्यात आली.