तीनही बातम्या एकत्र पान ३ वर घेणे
धरणे आंदोलन : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा
धामणगाव रेल्वे : केंद्र सरकार विरोधातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांना काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. यावेळी पंचायत समिती सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, मोहन घुसळीकर, जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम, यशवंत बोरकर, ऋषिकेश जगताप, सुधीर शेळके, अलीम खलील खा पठाण, सुनील भोगे, मुकेश राठी, अविनाश इंगळे, प्रशांत भेंडे, मुकिंदा माहुरे, शुभम चौबे यांची उपस्थिती होती.
-----------------
फोटो पी ०४ काँग्रेस
काळे कायदे रद्द करा
अंजनगाव सुर्जी : कृषी व शेतकऱ्यांसंबंधीच्या कायद्यांना काळे कायदे संबोधून ते रद्द करण्याची मागणी तालुका व शहर काँग्रेसने केली आहे. सोबतच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी एसडीओंना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद दाळु, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, सुरेश आडे, निखिल कोकाटे, निखिल डाबरे, नीलेश ढगे, श्रीकृष्ण गावंडे, अमर शिंगणे, सुभाष गोळे, मुशफिक अली, शुभम बाळापुरे, अमिन शाह, मो.आबिद, मिर्जा जहीर बेग, विदर्भ बोबडे, अमोल घुरडे, रावसाहेब पखान, दिलीप इंगळे, शिवानंद अंबळकार, गुणवंत सरकटे, रणजीत दाळु, हेमंत येवले, सुधाकर खारोडे, प्रमोद मोरे, नीलेश देशमुख, अरविंद पखान, नरेंद्र निकम, मयुर रॉय, उमेश मंगळे, नानासाहेब गिते, संजय काळमेघ उपस्थित होते.
---- -
फोटो पी ०४ मोर्शी
मोर्शीत तहसील प्रशासनाला निवेदन
मोर्शी : कृषी विधेयक मागे घेण्याबाबत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आदोलकांना पाठिंबा व शेतीविरोधी कायदे रद्द करण्यात यावे, तसेच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ निधी वितरित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश काळे, मोरेश्वर गुडधे, बाजार समितीचे संचालक धनंजय तट्टे, मोर्शी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे, नगरसेवक मिलिंद पन्नासे, संजय आखरे, प्रकाश टेकाडे, भूषण कोकाटे, प्रदीप इंगळे, उमेश निंबाळकर, गजानन चरपे, निसार भाई, वसीम अक्रम, सुहास ठाकरे आदी उपस्थित होते.